Sinhagad fort : शिवरायांना ‘असं’ही वंदन, सिंहगड किल्ल्याची भ्रंमती करत दिली माहिती; Video viral
Chhatrapati shivaji maharaj jayanti : ट्रेकर्ससाठी (Trekkers) शिवजयंती एक उत्साह भरणारा सण असतो. त्यांचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला राज्यभरात उत्साहात साजरी झाली. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं राजांना वंदन केलं. कुणी रांगोळी काढत, कुणी मर्दानी खेळ खेळत, कुणी चित्र-शिल्प काढत तर कुणी गड-किल्ले सर करत शिवाजी महाराजांना वंदन केलं. ट्रेकर्ससाठी (Trekkers) तर शिवजयंती एक उत्साह भरणारा सण असतो. ही संधी ते सोडत नाहीत. तर विविध गड-किल्ल्यांवर फिरणारे सर्वसाधारण लोकही आपण आजूबाजूला पाहत असतो. त्यांचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. किल्ले सिंहगड याठिकाणी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भेट देण्यासाठी आलेल्या काही तरुणांचा हा व्हिडिओ आहे. रोहित झिंझुर्के या तरुणानं हा व्हिडिओ बनवलाय, जो सध्या प्रचंड व्हायरल झालाय.
दिली सिंहगडाची माहिती
किल्ले सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ तयार करण्यात आलाय. संबंधित तरूण सिंहगडावर कधीही आलेला नाही. त्यानं तशी माहिती व्हिडिओमध्ये दिलीय. कोंढाणा असं या किल्ल्याचं नाव होतं. मात्र तानाजी मालुसरे यांच्या लढाईनंतर याला सिंहगड असं नाव पडल्याची माहिती तो व्हिडिओतून देतो. तोफखान्यासह तो गडावरच्या विविध ठिकाणांना त्यानं भेट दिली तसंच गाइडकडून गडासंबंधीची माहिती जाणून घेतली. हा व्हिडिओ पाहण्यासारखा असल्यानं व्हायरल झाला आहे.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर रोहित झिंझुर्के (Rohit Zinjurke) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 19 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्यात सातत्यानं वाढच होत आहे. या चॅनेलवर विविद प्रकारचे व्हिडिओ अपलोड होत असतात. आता गडभ्रमंतीचा हा व्हिडिओ अपलोड झाला असून तो व्हायरल झालाय. ‘CHHATRAPATI SHIVAJI JAYANTI SPECIAL | 2000 SAAL PURANE FORT PAR DOSTON KE SATH TREKK KIYA IS BAAR!!’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. (Video courtesy – Rohit Zinjurke)