आजवर वृत्तवाहिन्यांच्या न्यूजरुममधील (Newsroom) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. न्यूजरुममध्ये घडलेला विनोदी प्रकार किंवा वाद हे सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरले. पण नुकतंच एका तेलुगू वृत्तवाहिनीवर भलताच प्रकार घडला आणि सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याचीच चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता (Telugu Actor) विश्वक सेनने (Vishwak Sen) त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका वृत्तवाहिनीच्या न्यूजरुममध्ये हजेरी लावली. न्यूजरुममध्ये अँकर आणि विश्वक यांच्या चर्चा सुरू असताना अचानक वाद झाला आणि या वादानंतर अँकरने त्याला थेट स्टुडिओमधून बाहेर जाण्यास सांगितलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेही हा व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या व्हिडीओमध्ये विश्वक अँकरला सुनावताना दिसतोय, “माझ्याबाबत वैयक्तिक टिप्पणी करण्याचा तुला अधिकार नाही. तोंड सांभाळून बोल. तू मला डिप्रेस्ड किंवा पागल सेन म्हणू शकत नाही. मी तुझ्यावर कारवाई करू शकतो पण ते मी करणार नाही. कारण तसं केल्यास तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक राहणार नाही.” हे ऐकल्यानंतर संतापलेली अँकर त्याला थेट स्टुडिओमधून बाहेर जाण्यास सांगते. विश्वक सेन अपशब्द वापरत पुढे म्हणतो, “तुम्ही मला इथे बोलावलात.” तेव्हासुद्धा अँकर त्याला बाहेर जाण्यास सांगते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विश्वकच्या चाहत्यांनी टीव्ही अँकरवर जोरदार टीका केली. तर दिग्दर्शक राम गोपाल वर्माने अँकरचं कौतुक केलं.
I never saw a woman looking so much more powerful than a man ??? @Devi_Nagavalli is no less than SARKAR ??? pic.twitter.com/QbJIMTbR0K
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 2, 2022
That’s too rude of her. If a guest is misbehaving she can take them off air but humiliating like this on camera is a big no. #TV9 #VishwakSen #AnchorDevi https://t.co/jXENCMAijP
— Green T ☕️ (@geetmh) May 2, 2022
This is bad behaviour by @TV9Telugu anchor. I bet that guy didn’t come there of his own accord. You invited him right? https://t.co/HUxZsonKPu
— Kaushal S Inamdar| कौशल इनामदार (@ksinamdar) May 2, 2022
मी याआधी एखाद्या स्त्रीला पुरुषापेक्षा इतकं शक्तीशाली असल्याचं पाहिलं नाही. देवी नागवल्ली (अँकर) या सरकारपेक्षा कमी नाहीत, अशी प्रतिक्रिया राम गोपाल वर्मा यांनी दिली. तर ‘हे अत्यंत चुकीचं वागणं आहे. जर न्युजरुममध्ये आलेला पाहुणा चुकीचा वागत असेल तर तिने तो कार्यक्रम ऑन एअरवरून काढायला पाहिजे होता. असं कॅमेरासमोर अपमान करणं चुकीचं आहे’, असं एका युजरने म्हटलं. ‘जर तो स्वत:ची बाजू मांडतोय तर ती त्याला बाहेर जायला कसं सांगू शकते? यावरून अँकरचा अहंकार दिसून येतो’, अशी कमेंट दुसऱ्याने केली.
दरम्यान भररस्त्यात गोंधळ घातल्याप्रकरणी विश्वकविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सेन यांच्या कारसमोर एक व्यक्ती आली आणि स्वत:ला पेटवून देण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली. सेन त्याला आत्महत्येच्या प्रयत्नापासून रोखताना दिसत होता. पण ‘द हंस इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं की हा एक प्रँक व्हिडिओ आहे आणि चित्रपटाच्या जाहिरातीसाठी स्टंट नाही. त्यानंतर रस्त्यावर गोंधळ घातल्याच्या आरोपावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.