Elon Musk Twitter Deal : 44 बिलियन डॉलरची डील रद्द करणाऱ्या एलन मस्कना ट्विटर खेचणार कोर्टात

टेस्लाचे मालक असणारे एलन मस्क आणि ट्विटर दरम्यान कायदेशीर लढाई सुरू होणार असून ट्विटरने मस्क यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. एलन मस्क यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यूयॉर्कमधील सर्वात मोठी कायदेशीर फर्म ट्विटरतर्फे या लढाईत उतरणार आहे.

Elon Musk Twitter Deal : 44 बिलियन डॉलरची डील रद्द करणाऱ्या एलन मस्कना ट्विटर खेचणार कोर्टात
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 4:47 PM

नवी दिल्लीः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क (Elon Musk)यांनी शनिवारी ट्विटरला मोठा झटका दिला. मस्क यांनी ट्विटरसोबत (Twitter) केलेला 44 बिलियन डॉलर्सचा करार रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर आता ट्विटरनेही मस्क यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘वॉचेल, लिप्टन , रोझेन ॲंड कॅट्झ एलएलपी’ या न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या कंपनीकडे ट्विटरने मस्क यांच्याविरोधातील कायदेशीर लढाई लढण्याची जबाबदारी सोपवली आहे. पुढील आठवड्यात , डेलवेअर येथे ट्विटरतर्फे मस्कविरोधात खटला दाखल करण्यात येईल. तर ‘क्विन इमॅन्युएल अर्कहार्ट ॲंड सलिव्हॅन’ ही लीगल फर्म मस्क यांची बाजू मांडणार आहेत.

‘आम्हाला हा करार पूर्ण करायचा आहे. हा करार फायनल करताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्यानुसार ठरलेली किंमत देऊन एलन मस्क यांना हा करार पूर्ण करावाच लागेल. आणि यासाठी आम्ही मस्क यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करु’ असे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट लेअर यांनी स्पष्ट केले. न्यायालयात आम्ही हा दावा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

14 एप्रिल रोजी मस्क यांची ट्विटर खरेदीची घोषणा

एलन मस्क यांनी 14 एप्रिल रोजी ट्विटरसोबत झालेल्या कराराबाबत घोषणा केली होती. 44 बिलियन डॉलरमध्ये हा व्यवहार झाल्याचे मस्क यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवादही साधला होता. मात्र काही काळापासून मस्क आणि ट्विटर यांच्यादरम्यान वाद सुरू होता. अखेर शनिवारी मस्क यांनी ट्विटरसोबत केलेला 44 बिलियन डॉलरचा करार रद्द करत असल्याची घोषणा केली. एलन मस्क यांनी हा निर्णय का घेतला याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ट्विटरवर किती फेक खाती आहेत, याची अचूक माहिती कंपनीला देता न आल्याने तसेच या करारदरम्यान ज्या अटी घालण्यात आल्या होत्या, त्यांचे उल्लंघन झाल्याने मस्क यांनी हा करार रद्द केल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही एलन मस्क आणि ट्विटरदम्यान कुरबूर सुरू होती. इलेक्ट्ऱॉनिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटरसोबत मोठआ करार केला होता. मात्र , काही मुद्यांवरून त्यांच्यात वाद सुरू होता. बनावट खात्यांबद्दल माहिती दिली नाही तर आपण या करारापासून दूर होऊ, असा इशारा मस्क यांनी दिला होता. अखेर शनिवारी त्यांनी ट्विटरसोबतचा करार रद्द करत असल्याची घोषणा केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.