Photo : ‘…तर मला विमानातून फेकून द्या’, वडा पावच्या फोटोची ‘ही’ पोस्ट होतेय Viral
Food in Flight : वडा पाव (Vadapav) त्यात्या किंमतीमुळे (Price) चर्चेत आला आहे. पुलकित कोचर नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवर फ्लाइटच्या मेनू कार्डचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वडा पावची किंमत $ 3 म्हणजेच 250 रुपये सांगितली आहे.
Food in Flight : विमानतळावर तुम्ही गेला असाल किंवा फ्लाइटने प्रवास केला असेल, तर तुम्हाला तिथे खाद्यपदार्थ आणि पाणी यासोबतच किती महागड्या वस्तू उपलब्ध असतात, हे माहीत असेल. बाहेर 10-20 रुपयांना मिळणारा खाद्यपदार्थ फ्लाइटमध्ये किंवा विमानतळावर 150-200 रुपयांच्या वर जातो. आता असाच आपल्या सर्वांचा फेव्हरेट वडा पाव (Vadapav) त्यात्या किंमतीमुळे (Price) चर्चेत आला आहे. साधारणपणे कुठेही गेलात तरी ज्याची किंमत 10-20 रुपयांपेक्षा शक्यतो वर जात नाही, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की फ्लाइटमध्ये (Flight) या वडा पावाची किंमत 100-150 नाही तर 250 रुपयांपर्यंत जाते. होय, आजकाल सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुलकित कोचर नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवर फ्लाइटच्या मेनू कार्डचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वडा पावची किंमत $ 3 म्हणजेच 250 रुपये सांगितली आहे.
ज्यांना माहीत नाही ते…
शेअर केलेली पोस्ट पाहून तुम्ही कल्पना करू शकता, की आपल्याकडे सगळीकडे मिळणारा वडा पाव 10-20 रुपयांना विकला जात असला तरी विमान प्रवासात त्याची किंमत अनेक पटींनी वाढते. ज्यांना वडापावची किंमत माहीत नाही, ते फ्लाइटमध्ये खरेदी हे करतात, पण ज्यांना माहिती आहे, ते फ्लाइटमध्ये वडापाव क्वचितच खातात.
Mujhe kabhi ye flight mein khaate dekhlo to plane se hi neeche fek dena pic.twitter.com/6tAstH3wiz
— Pulkit Kochar (@kocharpulkit) March 13, 2022
शेअर केले फ्लाइटमधील खाण्याचे अनुभव
फोटो शेअर करताना पुलकित कोचरने लिहिले, की तुम्ही मला फ्लाइटमध्ये हे खाताना पाहिल्यास विमानातून खाली फेकून द्या’. ही पोस्ट पाहिल्यानंतर, लोकांनी फ्लाइटमधील जेवणाचे अनुभवदेखील शेअर केले आहेत. एका यूझरने सांगितले, की सुमारे 5 वर्षांपूर्वी त्याने फ्लाइटमध्ये फक्त एक वाटी पोहे घेतले होते. त्याची किंमत 200 रुपये होती. तर आणखी एका यूझरने असेही सांगितले, की 3 वर्षांपूर्वी फ्लाइटमध्ये त्याने चिकन नूडल्स 300 रुपयांना विकत घेतले होते. आणखी एका यूझरने सांगितले, की त्याने विमानतळावर 260 रुपयांना चिकन रोल विकत घेतला होता. त्याचवेळी इतर काही यूझर्सनीही वडा पावची पोस्ट पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
I made a pact with myself, if I eat a Vadapav more than 50₹ ever, I’m going to finish myself.
— vivvvek.eth (@thevivekkamble) March 14, 2022
Mujhe kabhi ye flight mein khate dekh loh toh samajh jaana I have arrived in life.
— Ayush Agrawal, (FMVA)® (@ayush_agr87) March 14, 2022
Bahar kisi ne vada pao order kiya hai Staff: pic.twitter.com/farDp15dS5
— Bojang bugami (@bojangGanduHai) March 14, 2022