VIDEO | मेट्रोमध्ये दोन मुलं स्कर्ट घालून फिरतायेत, मग इतर प्रवासी तुफान हसले, नेटकरी म्हणाले…
Delhi Metro | मेट्रोमधील दोन मुलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. दोन्ही मुलं मेट्रोमध्ये स्कर्ट घालून फिरत आहेत. त्यानंतर जे काही झालं ते पाहून अनेकांना हसू आवरत नाही अशी स्थिती आहे.
दिल्ली : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक चर्चेचा विषय ठरत आहे. कारण तिथं जाऊन प्रसिध्द होण्यासाठी अनेकजण वाटेल ते करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर रोज नव्याने व्हिडीओ सुध्दा येत आहेत. प्रत्येकवेळी एक नवी कल्पना घेऊन व्हिडीओ तयार करण्यात येत आहे. काहीजण मेट्रोमध्ये (Metro Viral Video) चादर अंथरुन झोपत आहेत, तर काहीजण नाचगाणं करत आहेत, तर काहीजण मेट्रोमध्ये अंघोळ करीत आहेत. अशा पद्धतीचे रोज नवे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यासाठी मेट्रोकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही, असे नाही, परंतु तरीही लोक अशा पद्धतीची कृत्य करीत आहेत.
सध्या दोन मुलांनी इंन्स्टाग्रामवरती एक रील्स तयार केलं आहे. त्यामध्ये दोघांनी स्कर्ट घातले आहेत. दोघंही मेट्रोमधून फिरत आहेत. त्यानंतर जे काही झालं आहे, ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. शेजारी प्रवास करणारी लोकं त्यांच्याकडे एक सारखे पाहत आहेत. त्यापैकी काही प्रवासी हसत आहेत. त्याचबरोबर काही प्रवासी त्यांना पाहून संतापले आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची सुध्दा प्रतिक्रिया कशा पध्दतीची असेल हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा.
View this post on Instagram
व्हिडीओला इंन्स्टाग्रामवरती @_bhavyakuma या व्यक्तीच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर ४० हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. लोकांनी हजारोच्या संख्येने कमेंट देखील केल्या आहेत. काही लोकं म्हणत आहेत की, हा स्कर्ट नाही. डेनिमची लुंगी आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, काय चाललंय मेट्रोमध्ये, एक नेटकरी म्हणतो, कपडे घालून फिरतायेत हेचं सध्या महत्त्वाचं आहे. एका नेटकऱ्याने मजेशीर कमेंट केली आहे, तो म्हणाला, दोघांनी अधिक चांगलं काम केलं आहे. या व्हिडीओवरती तुमचं मतं आहे ? कमेंटमध्ये नक्की सांगा.