Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | दोन मधमाश्यांची चक्रावून सोडणारी कामगिरी, शीतपेय पिण्यासाठीची धडपड एकदा पाहाच

शार मधमाश्यांनी चक्क Fanta या शीतपेयाचे झाकण उघडले आहे. त्यांच्या या करामतीचा व्हिडीओ पाहून अनेकजण चक्रावले आहेत.

Video | दोन मधमाश्यांची चक्रावून सोडणारी कामगिरी, शीतपेय पिण्यासाठीची धडपड एकदा पाहाच
FANTA AND BEE VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 7:06 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यापैकी काही व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होतात. पक्षी तसेच प्राण्यांच्या विविध करामतींचे व्हिडीओ आजकाल जास्त आवडीने पाहिले जात आहेत. सध्या असाच दोन मधमाश्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हुशार मधमाश्यांनी चक्क Fanta या शीतपेयाचे झाकण उघडले आहे. त्यांच्या या करामतीचा व्हिडीओ पाहून अनेकजण चक्रावले आहेत. (Two honey bees opening Fanta cold drink bottle funny video goes viral on social media)

मधमाश्यांची कमाल, व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती

सध्या उन्हाळा सुरु असल्यामुळे शीतपेय पिण्याकडे अनेकांचा कल आहे. काही शीतपेय हे अतिशय गोड असतात. याच कारणामुळे Fanta या शीतपेयाची चव चाखण्यासाठी व्हिडीओतील मधमाश्यांची धडपड चालू आहे. या व्हिडीओमध्ये तसे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये Fanta या शीतपेयावर झाकण आहे. मात्र, व्हिडीओतील दोन मधमाश्या अतिशय चलाखीने Fanta चे झाकण उघडत आहेत. दोन्ही मधमाश्या झाकण वर फिरवताना दिसतायत. या दोन्ही मधमाश्यांचे संतुलित आणि यशस्वी प्रयत्न पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच मधमाश्यांच्या या चातुर्याची नेटकरी वाहवा करत आहेत.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मधमाश्यांनी Fanta या शीतपेयाचे झाकण यशस्वीपणे उघडल्यामुळे या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून आवडीने पाहिले जात आहे. हा व्हिडीओ Buitengebieden या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. शीतपेयांचे झाकण उघडणे हे अनेकांना दिव्य असल्यासारखे वाटते. मात्र, मधमाश्यांनी हा पराक्रम अगदी सहजपणे करुन दाखवल्यामुळे या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होतेय.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटकऱ्यांकडून त्याला आवडीने पाहिले जात असून अनेकजण उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने दोन मधमाश्यांनी मिळून शीतपेयाचे एक झाकण उघडणे हे अविश्वसनीय असल्याचे मत मांडले. तर अशा प्रकारचा व्हिडीओ मी पहिल्यांदा पाहिला असून हे सारं अद्भूत आहे, असे आणखी एका नेटकऱ्यांने म्हटले आहे.

इतर बातम्या :

Video : रुग्णांना वाचवण्यासाठी जबरदस्त जुगाड, ‘देशी रुग्णवाहिका’ पाहून तुम्हीही सलाम ठोकाल

Video | भरधाव वेगाने घेतला जीव, अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या अंगावर शहारे

VIDEO | मादीला पटवण्यासाठी तितराचा पिसारा फुलवून डान्स, नेटिझन्स म्हणतात भावा सोड, तिला इंटरेस्ट नाही

(Two honey bees opening Fanta cold drink bottle funny video goes viral on social media)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.