Video: दोन किंग कोब्रांची सायकलवर मजा-मस्ती, पुढे काय घडले पाहा व्हिडिओमध्ये
Video: दोन किंग कोब्रांनी घेतला सायकलचा ताबा, पाहा व्हिडीओत कशी करतायेत मजा-मस्ती
नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ (Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन किंग कोब्रांनी (king cobra) सायकलवरती ताबा घेतला आहे. त्याचबरोबर ते फणा काढून एकमेकांशी खेळत आहेत. विशेष म्हणजे दोन नाग खेळताना अनेकदा पाहायला मिळत नाही. परंतु दोन नाग सायकवरती बिनधास्त खेळत असल्याचं त्या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.
हा व्हिडीओ नेमका कुठल्या परिसरातला आहे, हे निश्चत सांगता येत नाही. परंतु त्या व्हिडीओमध्ये दोन नाग सायकलवरती फणा काढून खेळत आहेत. एक नाग सायकलच्या सीटवर फणा काढून उभा आहे. तर दुसरा सायकलच्या मागच्या सीटवर फणा काढून उभा आहे. हे दृष्ट ज्याने पाहिलं आहे, त्याने हे सगळं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे.
View this post on Instagram
_goga_ni_daya_ या इंन्स्टाग्राम युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या व्हिडीओला कमेंट करुन विविध प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ खूपवेळा पाहिला असल्याचं लोकांनी कमेंट करुन सांगितलं आहे.