Video : झुकेगा नही साला…! खासदार उदयनराजेंची “चला हवा येऊ द्या” मध्ये ग्रँड एन्ट्री

उदयनराजेंनी आता एक असा स्टंट केलाय की तो पाहून तुम्हीही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. उदयनराजेंची चला हवा येऊ द्या (Chala hawa yeu Dya) कार्यक्रमातली एन्ट्री एवढी कमाल होती की एखाद्या हॉलिवूड, बॉलिवूड अभिनेत्यालाही फेल करेल.

Video : झुकेगा नही साला...! खासदार उदयनराजेंची चला हवा येऊ द्या मध्ये ग्रँड एन्ट्री
उदयनराजेंची हवेतून एन्ट्री
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 11:05 PM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळे उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये (Udayanraje Collar style) प्रिय आहेत. मात्र याच उदयनराजेंनी आता एक असा स्टंट केलाय की तो पाहून तुम्हीही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. उदयनराजेंची चला हवा येऊ द्या (Chala hawa yeu Dya) कार्यक्रमातली एन्ट्री एवढी कमाल होती की एखाद्या हॉलिवूड, बॉलिवूड अभिनेत्यालाही फेल करेल. उदयनराजेंनी चक्क बाईकवरून हवेतून या कार्यक्रमात एन्ट्री घेतली. यावेळी पुष्पा सिनेमाची किती क्रेझ आहे हेही दिसून आलं. काय ती तुफान एन्ट्री आणि काय तो स्वॅग, ही एन्ट्री पाहून साताकरांच्या डोळ्याचे पारणं फिटली. राजे काहीही करू शकतात हे राजेंनी पुन्हा सिद्ध केलं.

उदयनराजेंची जबरदस्त डायलॉगबाजी

छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उद्या वाढदिवस असून यानिमित्त मागील 4 दिवसापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं आहे. त्याचाच एक भाग म्हणून झी मराठी या वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुष्पा या चित्रपटातील गाण्यावर बाईक वरून अनोखी इंट्री पहायला मिळाली. यावेळी डॉ. निलेश साबळे उदयनराजे यांना पुष्पा मधील डायलॉग सादर करण्याची विनंती केली. या वरून राजेंनी पुष्पा झुकेगा नहीं साला म्हणत स्टाईल मारून दाखवली. यावर उदयनराजेंचे फॅन फिदाच की.

ही एन्ट्री पाहाच

राजेंना पुष्पाची चांगलीच भुरळ

कोविड नियमांमधून थोडी सुट मिळाल्यामुळं यंदा उदयनराजेंचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. राजेंच्या कार्यकर्त्यांनी राजेंना आजपर्यंत नेहमी जोशमध्ये असणारे, हसते-खेळते राजे बघितले आहेत. राजेंनी याआधीही अनेकदा चाहत्यांची मनं जिकली आहेत. कधी उदयनराजे बाईकवरून भरधाव राईड मारताना दिसून येतात. तर हेच उदयनराजे कधी फिल्मी स्टाईलने जिप्सी पळवताना दिसून येतात. राजेंना चित्रपट पाहण्याचीही मोठी आवड आहे. अलिकडेच प्रदिर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटाने सर्वांना भुरळ घातली आहे. त्यातला पुष्पा, झुकेगा नहीं साला हा डायलॉग तर प्रत्येकाला पाठ झालाय. राजेंनाही या चित्रपटाची किती क्रेझ आहे. हे आज दिसून आलंय.

विरोधात असले की ईडी आणि भाजपात आले की घोटाळामुक्त, हे औषध कोणतं? अमित शाह यांना सुप्रिया सुळेंचा सवाल

‘दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं’, मलिकांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Dombivali Banner : एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी, आमदार रविंद्र चव्हाण यांचा बॅनरबाजी करीत आरोप

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.