नोकरीसाठी केला अर्ज अन् कॉल आला पण झाला उशीर तोपर्यंत… चार देश बदलल्यानंतर ही 48 वर्षांनी मिळाले पत्र
Job Application : लिंकनशायर येथील राहणाऱ्या टीजी हडसन यांना मोठा सूखद धक्का बसला. त्यांनी 48 वर्षांपूर्वी मोटारसायकल स्टंट रायडरच्या नोकरीसाठी अर्ज दिला होता. त्याचे उत्तर आता त्यांना मिळाले आहे. 1976 मध्ये त्यांनी अर्ज केला होता. पोस्ट ऑफिसकडून ते पत्र गहाळ झाले होते.
नोकरीसाठी अर्ज केल्यावर काय होईल, आपण निवडल्या जाऊ की नाही. आपल्याला मुलाखतीसाठी बोलावतील की नाही, अशी तगमग अनेकांनी अनुभवली असेल. पण इंग्लंडमधील 70 वर्षांच्या आजीला त्यांच्या नोकरीच्या अर्जाचे उत्तर 48 वर्षांनी मिळाले. तरीही या आजी आज खूष आहेत. कारण ती तसेच आहे. कारण या दरम्यान त्यांनी चार ते पाच देश बदलले. तरीही पोस्ट कार्यालयाने गहाळ झालेले हे पत्र त्यांच्यापर्यंत पोहचवलेच. टीजी हडसन यांच्या नोकरीच्या अर्जाची ही गोष्ट सध्या व्हायरल होत आहे. इंटरनेटवर त्यांच्या नावाचा आणि शहराचा शोध घेण्यात येत आहे.
स्टंट रायडर होण्याचे स्वप्न
लिंकनशायर येथील राहणाऱ्या टीजी हडसन यांनी एक धाडसी निर्णय घेतला होता. पुरुषी सत्ता असलेल्या क्षेत्रात मोटारसायकल रायडर म्हणून त्यांना स्वतःची ओळख तयार करायची होती. 1976 मध्ये त्यांनी या नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याकाळी महिलांना या नोकरीसाठी निवडल्या जात नव्हते. तरीही त्यांनी या पदासाठी अर्ज केला होता.
महिला असल्याचे लपवले
टीजी हडसन यांना माहिती होते की, एका महिलेला त्याकाळी हा जॉब मिळणे अवघड होते. त्यामुळे त्यांनी स्त्री असल्याची माहिती खुबीने लपवत मोटारसायकल रायडर पदासाठी अर्ज केला होता. या खेळासाठी माझ्या किती हड्ड्यांचा भुगा होईल, याची मला पर्वा नव्हती. मला तो थरारक अनुभव घ्यायचा होता. त्यासाठी मी तयार होते, असे हडसन यांनी सांगितले. कंपनीने त्यांच्या या पत्राला उत्तर दिले. पण ते टपाल खात्याकडून गहाळ झाले होते. तरीही पोस्टाने त्यांचे हे पत्र शोधून त्यांना 48 वर्षांनी दिले.
हडसन यांना बसला आश्चर्याचा धक्का
त्यांनी काही दिवस नोकरी मिळण्याची वाट पाहिली. पण पत्र न मिळाल्याने त्यांना विसर पडला. 48 वर्षांनंतर हडसन यांना त्यांच्या त्या नोकरीच्या अर्जाचे उत्तर मिळाले. मी अनेकदा विचार केला की मला नोकरीसाठी केलेल्या अर्जाचे उत्तर मिळाले नाही, असे त्यांनी बीबीसी बोलताना सांगितले. ही नोकरी न मिळाल्याने पुढे हडसन यांनी स्नॅक हँडलर, घोडा व्हिस्परर, एरोबेटिक पायलट आणि फ्लाईंग इंस्ट्रक्टर अशी कामे करावी लागली. त्यासाठी त्यांनी जगात अनेक ठिकाणं निवडली. त्यानंतर त्या लिंकनशायरमध्ये स्थायिक झाल्या.
स्वप्न तसेच उराशी
मोटारसायकल स्टंट रायडर होण्याचे स्वप्न तसंच उराशी बाळगल्याचे त्या सांगतात. लंडनमधील आपल्या फ्लॅटमध्ये टाईपरायटरवर आपण ते पत्र टाईप केले आणि त्याला उत्तर येईल म्हणून कित्येक दिवस वाट पाहिल्याच्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या. त्यांचे हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगून ठेवले आहे.