Viral : ‘…तर जग खूप वेगळं असतं’, असं काय म्हणून गेली आणि Troll झाली ‘ही’ American actress?
Russia Ukraine War : अमेरिकन अभिनेत्री (American actress) अॅनालिन मॅककॉर्डनेही (AnnaLynne McCord) हल्ले थांबवून रशियाला शांततेचे आवाहन केले आहे. मात्र, तिच्या व्हिडिओमध्ये ती असे काही बोलली, की लोकांनी तिला ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या शहरांवर बॉम्बफेक करत आहे. दरम्यान, जगभरातून लोक शांततेचे आवाहन केले जात आहे. हे युद्ध लवकर संपावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या माध्यमातून विविध व्हिडिओ समोर येत आहेत. काही अत्यंत धक्कादायक आहेत. कारण यात सैनिक, नागरिक जखमी झाल्याचेही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही भावनिक व्हिडिओही आहेत. आता यातच अमेरिकन अभिनेत्री (American actress) अॅनालिन मॅककॉर्डनेही (AnnaLynne McCord) सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले थांबवून रशियाला शांततेचे आवाहन केले आहे. मात्र, तिच्या व्हिडिओमध्ये ती असे काही बोलली, की लोकांनी तिला ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आई होण्याची इच्छा एका कवितेतून व्यक्त केली होती. त्यानंतर लोकांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर खिल्ली
2 मिनिट 20 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 34 वर्षीय अभिनेत्री अॅनालिन मॅककॉर्ड कवितेच्या माध्यमातून ‘प्रिय राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन. मी तुझी आई नाही याचे मला खूप वाईट वाटते. जर मी तुझी आई असते तर मी तुझ्यावर खूप प्रेम केले असते. यासोबतच या अभिनेत्रीने पुतीनला वाढवले असते तर त्यांचे आयुष्य कसे वेगळे झाले असते, असेही व्हिडिओमध्ये सांगितले आहे. अभिनेत्रीच्या या कवितेसाठी तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. यूझर्स तिला खूप ट्रोल करत आहेत.
Dear Mister President Vladimir Putin… pic.twitter.com/LbDFBHVWJf
— AnnaLynne McCord (@IAMannalynnemcc) February 24, 2022
प्राणही दिला असता…
व्हिडिओमध्ये अभिनेत्री अॅनालिन मॅककॉर्डने म्हटले आहे, कीजर मी तुझी आई असते, जर जग वेगळे असते, तर मी तुला सुरक्षित ठेवण्यासाठी मेले असते. तुझ्यासाठी मी माझा प्राण अर्पण केला असता. अभिनेत्री पुढे म्हणते, रशियन नेत्याची (पुतिन) आई होण्यासाठी माझा जन्म खूप उशीरा झाला यावर माझा विश्वास बसत नाही.
I found this little poem my 9 yr old learned at school and felt it important enough to write down and bring home. Guess I should’ve had him read it on video- it’s just as good. pic.twitter.com/Cp6o1QJQpC
— ClassicSarah (@classicsarah_) February 24, 2022
You’re the first female comic that’s actually made me laugh
— ELIJAH ???? (@ElijahSchaffer) February 24, 2022
— Ryan Asher (@Reen_Machine) February 25, 2022
What we’re not going to do in the middle of potential ww3 is start blaming women/mothers for how men in power behave. There’s still time to delete this babe pic.twitter.com/OfaehLdUJu
— Paladin (@PaladinAmber) February 24, 2022