जड अंत:करणानं पत्नी आपल्या पतीला देतेय निरोप, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Viral झाला Emotional video

Russia Ukraine war : सध्या सोशल मीडियावर (Social media)अनेक व्हिडिओ (Video) समोर येत आहेत. काही अत्यंत धक्कादायक आहेत. तर काही भावुक (Emotional) करणारे आहेत. आता जो व्हिडिओ समोर आला आहे तो खूपच भावुक करणारा आहे.

जड अंत:करणानं पत्नी आपल्या पतीला देतेय निरोप, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Viral झाला Emotional video
युद्धादरम्यान पतीला निरोप देताना पत्नी
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 2:24 PM

Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यात विनाशकारी युद्ध सुरू आहे. यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. प्रत्येकजण रशियाला युद्ध संपवण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओंमध्ये रशियन हल्ल्यानंतरचे भयानक दृश्य दिसत आहे, तर काहींमध्ये हल्ल्याच्या भीतीने लोक सुरक्षित स्थळी धावताना दिसत आहेत. रशिया मात्र माघार घेण्यास तयार नाही. युक्रेनने शस्त्रे टाकावीत, अन्यथा रक्तपात अटळ आहे, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media)अनेक व्हिडिओ (Video) समोर येत आहेत. काही अत्यंत धक्कादायक आहेत. तर काही भावुक (Emotional) करणारे आहेत. आता जो व्हिडिओ समोर आला आहे तो खूपच भावुक करणारा आहे. व्हिडिओमध्ये युक्रेनचे सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी त्यांना त्यांच्या पत्नी निरोप देताना दिसत आहेत.

पत्नी देत आहेत निरोप

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये युक्रेनचे सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी त्यांच्या पत्नींना निरोप देताना दिसत आहेत. त्यांच्या पत्नींच्या डोळ्यात ओलावा आणि भीतीही दिसत आहे. तर पती जड अंत:करणाने कुटुंबाचा निरोप घेत आहे. यादरम्यान एका सैनिकाची पत्नी ढसाढसा रडते. हे एक अतिशय भावनिक दृश्य आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर, प्रत्येकजण त्यांच्या खात्यावर हा अत्यंत भावनिक 15 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

बाप-लेकीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

याआधी आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक बाप आपल्या मुलीला सुरक्षितस्थळी पाठवण्यापूर्वी रडत होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वडील बसमध्ये बसून आपल्या मुलीचा निरोप घेत आहेत, यादरम्यान वडील आणि मुलीच्या दोघांचेही डोळे पाणावलेले आहेत.

आणखी वाचा :

Russia-Ukraine War : कोण आहे ‘ही’ शस्त्रधारी युक्रेनी महिला? जीची सोशल मीडियावर सुरूये जोरदार चर्चा

Viral : ‘…तर जग खूप वेगळं असतं’, असं काय म्हणून गेली आणि Troll झाली ‘ही’ American actress?

Viral : ‘हा’ प्राणी नेमका आहे तरी कसा? Photo पाहून विचाराच पडले यूझर्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.