लग्नाच्या जेवणात एक्स्ट्रा पापड न मिळाल्याने तुफान हाणामारी, व्हीडीओ व्हायरल

| Updated on: Jan 23, 2023 | 5:38 PM

केरळच्या अलाप्पुझा येथील मुट्टम गावातील एका लग्नाच्या हॉलमध्ये लग्नाचे जेवण सुरू असताना वर पक्षाने एक्स्ट्रा पापड मागितल्याने ही ठीणगी उडाल्याचे म्हटले जात आहे.

लग्नाच्या जेवणात एक्स्ट्रा पापड न मिळाल्याने तुफान हाणामारी, व्हीडीओ व्हायरल
papad-keral
Image Credit source: papad-keral
Follow us on

केरळ : लग्न म्हटलं वधू आणि वरपक्षाची मानापमान आणि रुसवी फुगवी आलीच. परंतू देशाच्या सर्वात सुशिक्षित राज्यात एका लग्नाच्या जेवणात एक्स्ट्रा पापड न मिळाल्याने तुफान हाणामारी झाल्याचा व्हीडीओ चांगलात व्हायरल होत आहे. काय झाल्याने या व-हाडींची पापडावरून जुंपली याबद्दल समाजमाध्यमावर विविध मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून पोलीसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

केरळच्या अलाप्पुझा मध्ये लग्नमंडपाचे कुरूक्षेत्र झाल्याचा व्हीडीओ ट्वीटरवर व्हायरल होत आहे. पाहूणे मंडळींना लग्नात पापड कमी पडल्याने वादाला सुरूवात झाल्याचे म्हटले जात आहे. लग्नात वर पक्षाच्या काही मंडळींना जेवणाच्या पंगतीत पापड कमी पडले याची तक्रार लागलीच त्यांनी वधू पक्षाला केली. शब्दावरून शब्द वाढत गेला. हमरी तुमरी होत एकमेकांवर आधी चपला नंतर खुर्च्या फेकण्यापर्यंत ही वर आणि वधुपक्षांच्या मंडळींची ही हाणामारी पोहचली. त्यामुळे याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून देशाच्या त्यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

केरळच्या अलाप्पुझा येथील मुट्टम गावातील एका लग्नाच्या हॉलमध्ये लग्नाचे जेवण सुरू असताना वर पक्षाने एक्स्ट्रा पापड मागितल्याने ही ठीणगी उडाल्याचे म्हटले जात आहे. या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून पोलीसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हीडीओमध्ये अनेक पाहुण्यांचे कपडे देखील फाटल्याचे दिसत आहेत. या प्रकरणी समाजमाध्यमावर केरळ सारख्या सुशिक्षित राज्यात असे घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर काही जणांनी केरळचे मळ्याली पापडांसाठी जरा जास्तच हावरे झाल्याच्या प्रतिक्रीया समाजमाध्यमावर व्यक्त होत आहेत.