VIDEO | गाडीचा हँडल सोडून आजोबांनी उडी मारल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
VIRAL VIDEO | सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक आजोबा गाडीवर स्टंट करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओच्या खाली अनेक कमेंट केल्या आहेत.
मुंबई : सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा (VIRAL VIDEO) आहे. काही लोकं कधीचं भेटत नाहीत, परंतु ती लोकं सोशल मीडियावर दोस्त आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर काही गोष्टी अधिक जलद पद्धतीने व्हायरल (TRENDING VIDEO) होतात. त्याचबरोबर एखाद्या व्हिडीओला अधिक लाईक येण्यासाठी लोकं काहीही करायला तयार होतात. सध्या एका आजोबांचा एक व्हिडीओ चांगलाचं (STUNT VIDEO) व्हायरल झाला आहे. त्या आजोबांनी बाईकवरती एक स्टंट केला आहे. विशेष म्हणजे त्या आजोबांनी हा स्टंट चालत्या बाईकवरती केली आहे. त्या आजोबांना व्हिडीओला लाईक मिळवायचे असल्यामुळे त्यांनी आपला जीव धोक्यात घालून व्हिडीओ तयार केला आहे.
आजोबा कधी गाडीचा हँडल सोडत आहेत
त्या आजोबांचे आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्या आजोबांनी सफेद कुर्ता आणि पायजमा घातला आहे. त्याचबरोबर त्यांची दाडी पुर्ण पांढरी झाली आहेत. आजोबा कधी गाडीचा हँडल सोडत आहेत. कधी त्या गाडीवर झोपतं आहेत. कधी त्या गाडीवर डान्स सुध्दा करीत आहेत. त्यामुळे आजोबांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचा एक चाहतावर्ग सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
इन्हीं हरकतों की वजह से सरकार ने पुरानी पेंशन योजना बंद की है। 😅 pic.twitter.com/9On89AL5SJ
— Ankit Yadav Bojha (@Ankitydv92) August 13, 2023
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी
सध्याचा व्हिडीओ चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्यांचे व्हिडीओ लोकं पाहत असल्यामुळे त्यांनी अनेक व्हिडीओ तयार केले आहेत. लोकं त्यांचे व्हिडीओ पाहून त्यावर कमेंट सुध्दा करीत आहेत. काही लोकांना आजोबांचं हे वागणं पटलेलं नाही. त्यांच्यावर काही लोकं नाराज असल्याचे कमेंटमध्ये दिसत आहे. अशा पद्धतीचं कृत्य एखाद्या जवानाने केलं असतं, तर त्याची तक्रार पोलिसांकडे केली असती. आणखी एकजण म्हणतो की, त्यांना मृत्यूची अजिबात भीती वाटत नाही. आणखी एकाने जवानी जिंदाबाद असं म्हटलं आहे.