बाथरूमची भिंत पाडली अन् सोन्याची नाणी बदाबदा पडली, अवघ्या काही मिनिटात रंकाचा राव; 66 लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ
बाथरूमची दुरुस्ती करताना भिंतीतून सोन्याची नाणी आणि तिजोरी सापडल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एक व्हिडीओमध्ये भिंत तोडताना सोन्याची नाणी, पडत असल्याचं दिसत आहे. अजूनही काही मौल्यवान गोष्टी या भिंतीतून पडताना दिसत आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळली जात असली तरीही हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्रीमंत कुणाला व्हायचं नसतं? प्रत्येकाला रातोरात श्रीमंत व्हायचं असतं. त्यासाठी अनेकजण अनेक जुगाड करतात. एखाद्या स्किममध्ये भरपूर पैसे गुंतवतात, शेअर मार्केटमध्येही पैसा गुंतवतात. काही लोक लॉटरीत तर काही लोक जुगार खेळून नशीब अजमावतात. पण काहीच हाती लागत नाही. काही लोकांना खजिना सापडण्याचे स्वप्न पडतात. पण हे स्वप्न स्वप्नच असतात. ते कधी पूर्ण होत नाहीत. पण जर एखाद्या व्यक्तीला घरातच खजिना सापडला तर…? विश्वास बसत नाही ना? एका व्यक्तीच्या बाबतीत तसं झालंय. त्याला चक्क बाथरूममध्येच खजिना सापडला अन् तो क्षणात रंकाचा राव झालाय. कुठं बरं घडली ही घटना?
सोन्याचं नाणं अन् बाथरूमची तिजोरी
‘ब्राइट साइड‘ (Bright Side) यांनी त्यांच्या @brightside.official इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी एका व्यक्तीला बाथरूममध्ये सोन्याचा खजिना सापडल्याचा दावा केला आहे. या बातमीच्या सत्यतेबाबत टीव्ही9 मराठी पृष्टी करत नाही. पण या व्यक्तीने शेअर केलेली गोष्ट इंटरेस्टिंग आहे. व्यक्तीच्या आयुष्यात असं झालं तर काय होऊ शकतं असं सांगणारी आहे. त्यामुळेच आम्ही या व्हिडीओत काय दिसतं, ते शेअर करत आहोत. या व्यक्तीने त्याच्या या व्हिडीओला भन्नाट कॅप्शन दिलं आहे. “सोन्याचं नाणं आणि भिंतीत तिजोरी? एक अविश्वसनीय शोध.” असं कॅप्शन त्याने दिलं आहे. हे कॅप्शनही तितकंच दिलखेच आहे.
काय दिसतंय व्हिडीओत?
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कदाचित आपल्या बाथरूमची दुरुस्ती करत असल्याचं दिसतं. त्यासाठी तो बाथरूमची भिंत तोडताना दिसत आहे. भिंत तोडत असताना काही वेळाने भिंतीतून सोन्याची नाणी पडताना दिसत आहेत. सोन्याच्या नाण्याचा पाऊस पडत असल्याचं पाहून तो अधिकच खूश होतो आणि अधिक सोन्याची नाणी मिळेल या हव्यासापोटी दातओठ खाऊन भिंत तोडू लागतो. त्यानंतर काही वेळातच त्याला सोन्याची बरीच नाणी बाहेर पडताना दिसतात. यानंतर तो व्यक्ती थांबत नाही, कारण भिंतीतून काहीतरी अजून दिसू लागलेलं असतं.
View this post on Instagram
भिंतीत तिजोरी, तिजोरीत घबाड
सोन्याची नाणी पडल्यानंतरही त्याचं भिंत पाडणं सुरूच आहे. त्यानंतर नाण्यांचा ढिगं गडद होतो. नंतर तो हाताने बाकीचे सोने बाहेर काढत असल्याचं दिसतं. जेव्हा कॅमेरा भिंतीकडे जातो, तेव्हा त्यात एक तिजोरी दिसायला लागते. त्यामुळे भिंत आणखी फोडून तिजोरी बाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं. पण त्याचा प्रयत्न काही यशस्वी होताना दिसत नाही. तो पासवर्ड असलेल्या तिजोरीत काही अंकही दाबून बघतो. आताही पदरी निराशा. तिजोरी उघड नाही.
नंतर तो एक वेल्डिंग मशीन आणतो आणि तिजोरीमध्ये एक नट वेल्डिंग करतो. त्यानंतर रस्सी बांधून तो तिजोरी बाहेर काढतो. तिजोरी उचलून तो ती खिडकीतून बाहेर फेकतो. त्यानंतर तो तिजोरीचे तुकडे करून उघडतो आणि त्यात पैसे, एक कुटुंबाचा फोटो आणि मोबाइल फोन सापडतात. त्यासोबतच एक छोटी तिजोरी मिळते. त्यातही पैसे, एक छोटी बंदूक, हिऱ्यांचे दागिने आणि मेकअपच्या वस्तू असतात.
66 लाख लोकांनी व्हिडीओ पाहिला
या व्हिडीओची खासियत म्हणजे तो पाहताच क्षणी फसवा वाटतो. स्क्रिप्टेड वाटतो. लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा आपल्या इन्स्टा अकाऊंटला अधिक व्ह्यूज मिळण्यासाठी केलेला हा प्रयत्न वाटतो. पण काही का असेना सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्याला लाइक आणि शेअरही मिळत आहेत. हजारो कमेंट्सही येत आहेत. आता पर्यंत 66 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. काही लोकांनी हा व्हिडिओ फसवा म्हणून घोषित केला आहे.