जगातील सर्वात सुरक्षित कारमधून फिरतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, किंमत ऐकाल तर धक्का बसेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जी-20 परिषदेसाठी राजधानी दिल्लीत आले आहेत. त्यांच्या दिमतीला असलेल्या जगातील सर्वात सुरक्षित बुलेट आणि बॉम्ब प्रुफ कारची वैशिष्ट्ये पाहा काय

जगातील सर्वात सुरक्षित कारमधून  फिरतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, किंमत ऐकाल तर धक्का बसेल
USA-BIDEN CARImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 2:32 PM

नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : भारत यंदाच्या जी-20 संमेलनाचं यजमानपद भुषवित आहे. या भव्य संमेलनासाठी 20 सदस्य देशांसहीत 40 देशांचे नेते आणि प्रतिनिधी दिल्लीत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील या संमेलनात उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या खास ‘द बीस्ट’ या चिलखती बुलेट प्रुफ, बॉम्ब प्रुफ सर्व प्रकारच्या रासायनिक हल्ल्यापासून सुरक्षित असलेली त्यांच्या कारमधून बायडन प्रवास करणार आहेत. या कारची काय आहेत नेमकी वैशिष्ट्ये पाहूयात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची अधिकृत कार अनेक प्रकारच्या बॉम्ब हल्ले आणि रासायनिक हल्ल्यांपासून सुरक्षित आहे. अमेरिकेची प्रमुख कार निर्माण कंपनी जनरल मोटर्सच्या कॅडिलॅक मोटर कार डीव्हीजनने तयार केली आहे. या कारला मिलट्री-ग्रेड कवच, बुलेट प्रुफ खिडक्या आणि अश्रुधूर गॅस डिस्पेन्सरचा समावेश आहे. या कारचे कवच एल्युमिनियम, सिरॅमिक आणि स्टीलपासून तयार केले आहे. रासायनिक हल्ला झाला तरी ही कार सक्षम आहे. या कारमध्ये रासायनिक आणि जैविक हल्ल्यावेळी स्वत:ची ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था आहे.

या कारच्या दरवाज्यासाठी पाच इंच जाडीचा तर पाठच्या दरवाज्याला आठ इंच धातूचा वापर केला आहे. यात काच आणि पॉलिकार्बोनेटचा वापर केला आहे. ज्यामुळे बॉम्ब हल्ल्यातही आतील व्यक्ती सुरक्षित रहाते. यात अश्रुधुर गॅस डिस्पेन्सर, शॉटगन, स्मोक स्क्रीन आणि राष्ट्रपतीच्या रक्तगटाच्या दोन पिशव्या, संचार उपकरणे, जीपीएस यंत्रणा आणि नाईट व्हीजनचा समावेश आहे.

या कारची किंमत 12 कोटी रुपये

द बीस्ट कारमध्ये सात व्यक्ती बसू शकतात. या कारमध्ये अनेक संरक्षक सुविधा आहे. जी अन्य कारमध्ये नाहीत. या कारचे वजन आठ टन इतके आहे. या कारचे नवे मॉडेल साल 2018 मध्ये आले. या कारची किंमत 12 कोटी रुपयांहून अधिक आहे. द बीस्ट ही कार सर्वात आधी साल 2001 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुश यांच्या कार्यकाळात तयार झाली. नंतर तिच्यात वेळोवेळी अनेक बदल केले.

कारची काय आहेत वैशिष्ट्ये

– ही कार 15 सेंकदात 0 ते 100 किमी प्रति तासांचा वेग पकडते

– 5 इंच जाडीचे विंडो ग्लास पॉइंट 44 मॅग्नम बुलेटला रोखण्यास सक्षम

– 8 ते 10 टन कारचे वजन

– हल्लेखोरापासून वाचण्यासाठी वीजेचा झटक्यांसह अनेक उपाय

– बायडन यांच्या कारला 46 नंबर दिला आहे, ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.