Video : तीन तास महिलेच्या समोर साप फणा काढून उभा, महिला देवाचं नाव घेत राहिली, मग…
TRENDING NEWS : सध्या एक घटना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एक विषारी साप महिलेच्या पायाजवळ ३ तास खेळत होता. त्या महिलेने देवाला हात जोडले आणि देवाचं नाव घेत राहिली. इतक्या वेळ ती महिला सापाच्या समोर बसून सु्ध्दा त्या महिलेला सापाने काहीचं केलं नाही.
उत्तर प्रदेश : राज्यातील महोबा (Mahoba) येथे श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एका महिलेच्या समोर एक साप (snake viral video) तीन तास बसला होता. ती महिला अजिबात घाबरली नव्हती, ती महिला धाडस करुन भगवान शिवचं नाव घेत होती अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. ज्यावेळी तिथल्या इतर लोकांनी हा प्रकार पाहिला त्यावेळी त्यांनी सर्पमित्राला तिथं बोलावून घेतलं. सर्प मित्राने त्या सापाला तात्काळ ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या महिलेचा जीव वाचला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (viral video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. सगळ्या लोकांना धक्का बसला आहे की, विषारी सापाने त्या महिलेला कसल्याही प्रकारची इचा केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार संगम सदर तहसील अंतर्गत डहर्रा गावातील आहे. तिथं हमीरपुर जिल्ह्यात देवीगंज गावातील राहणारी महिला मिथिलेश यादव रक्षाबंधन असल्यामुळे आपल्या माहेरी आली होती. ज्यावेळी ती महिला रात्री झोपली होती. त्यावेळी तिथं एक साप आला, त्या महिलेच्या पायाला त्या सापाने गुंडाळून घेतलं. ज्यावेळी त्या महिलेला साप असल्याची जाणीव झाली, त्यावेळी त्या महिलेने देवाची आठवण काढली, आणि जोपर्यंत तो साप समोर होता. तोपर्यंत तो साप समोर होता, तोपर्यंत ती महिला देवाचं नाव घेत होती.
झोपून उठली त्यावेळी समोर साप होता
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता. ती महिला आपल्या माहेरी असलेल्या खाटेवर झोपली होती. त्या महिलेच्या पायात एक गुंडाळला होता. तो साप त्या महिलेला चावा घेण्याच्या हिशोबाने फणा काढून तिथं उभा होता. त्यावेळी त्या महिलेने सापाला हात जोडले आणि देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. ज्यावेळी हा प्रकार त्या महिलेच्या घरच्यांनी पाहिला, त्यावेळी त्यांनी या घटनेची कल्पना पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी सर्पमित्राला बोलावलं आणि सापाला ताब्यात घेतलं.
तीन तास महिलेच्या समोर साप फणा काढून उभा, महिलेला कसल्याची प्रकारची इचा नाही pic.twitter.com/4Qa1wQIhha
— mahesh gholap (@maheshgholap3) August 30, 2023
ती…होता विश्वास
ज्यावेळी त्या महिलेच्या पायाला सापाने गुंडाळले होते, त्यावेळी ती महिला त्या सापाला पाहून अधिक भयभीत झाली होती. परंतु त्या महिलेचा आस्थेवरती अधिक विश्वास होता. त्यामुळे ती महिला शांत राहिली आणि सापाच्या समोर देवाचं नाव घेत राहिली. त्या संपूर्ण गावात या महिलेच्या प्रकऱणाची सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्या देवाचा देखील चमत्कार म्हणता येईल की, त्या महिलेला कसल्याची प्रकारची इजा केलेली नाही अशी सु्ध्दा चर्चा आहे.