Video : कौतुक करावं तेवढं कमी!, 10 वर्षांच्या मुलाला पाच लाखांची रोकड सापडली, त्याने जशीच्या तशी परत केली…
मोहम्मद वसीम या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर साडे तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर एक हजार लोकांनी व्हीडिओ रिट्विट करत मोहम्मद हन्नानच्या कामगिरीचं कौतुक केलंय.
मुंबई : आपण अनेकदा पैश्यांसाठी विविध गुन्हे घडताना पाहतो. पैश्यासमोर अनेकांचं मन लालची होतं. पण समाजात काही घटना घटतात आणि आपल्यासमोर आदर्श निर्माण करतात. सध्या उत्तरप्रदेशमधली (Uttarpradesh) एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी सगळ्यांसाठी आदर्श ठरतीये. उत्तरप्रदेशमधल्या रायबरेली इथल्या एका मेकॅनिकचा मुलगा मोहम्मद हन्नान (Mohammed Hannan) याने समाजासमोर आदर्श उभा केलाय. अवघं 10 वर्षे वय असणाऱ्या मोहम्मद हन्नानला आईसोबत घरी जात असताना रस्त्यात एक बॅग सापडली. त्याने ती बॅग उघडली तर त्याला त्यात 5 लाख रुपयांची रोकड असल्याचं लक्षात आलं. त्यात नोटांचे बंडल त्याला दिसले. मग पुढे जे झालं त्यामुळे सगळ्यां समोर एक आदर्श निर्माण झाला.
मोहम्मद हन्नानला ज्या जागी ही बॅग सापडली त्याचठिकाणी तो थांबला. त्याला वाटलं की याच ठिकाणी या बॅगेचा मालक येऊ शकतो. तो या बॅगेच्या शोधात असेल. तो तिथेच थांबून राहिला. बॅगेचा मालक आला तेव्हा मोहम्मद हन्नानने ती बॅग परत केली. त्याच्या या कामाचं परिसरात कौतुक होतंय.
बरेली में एक बाइक मैकेनिक के बेटे मोहम्मद हन्नान उम्र 10 वर्ष को अपनी मां के साथ घर जाते समय सड़क पर 5 लाख रुपये का एक बैग पड़ा मिला। उसने बैग खोला, नोटों के कई बंडल पाए, उसने वहीं पर रुक कर बैग मालिक का इंतजार किया और बैग मालिक को वापस कर दिया. pic.twitter.com/Lv2FWF7nii
— Mohammad Waseem (@wasiiyc) April 22, 2022
नेमकं काय घडलं?
उत्तरप्रदेशमधल्या रायबरेली इथल्या एका मेकॅनिकचा मुलगा मोहम्मद हन्नान याने समाजासमोर आदर्श उभा केलाय. अवघं 10 वर्षे वय असणाऱ्या मोहम्मद हन्नानला आईसोबत घरी जात असताना रस्त्यात एक बॅग सापडली. त्याने ती बॅग उघडली तर त्याला त्यात 5 लाख रुपयांची रोकड असल्याचं लक्षात आलं. त्यात नोटांचे बंडल त्याला दिसले. मग पुढे जे झालं त्यामुळे सगळ्यां समोर एक आदर्श निर्माण झाला. मोहम्मद हन्नानला ज्या जागी ही बॅग सापडली त्याचठिकाणी तो थांबला. त्याला वाटलं की याच ठिकाणी या बॅगेचा मालक येऊ शकतो. तो या बॅगेच्या शोधात असेल. तो तिथेच थांबून राहिला. बॅगेचा मालक आला तेव्हा मोहम्मद हन्नानने ती बॅग परत केली. त्याच्या या कामाचं परिसरात कौतुक होतंय.
हा व्हीडिओ मोहम्मद वसीम या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर साडे तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर एक हजार लोकांनी व्हीडिओ रिट्विट करत मोहम्मद हन्नानच्या कामगिरीचं कौतुक केलंय. अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. तुझ्यासारख्या लोकांमुळे आपल्या भारतात माणुसकी जिवंत आहे, असं एकाने म्हटलंय.
संबंधित बातम्या