Video | व्हॅक्यूम क्लिनरने वृद्धाच्या तोंडातून काढला दातांचा सेट, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसू आवरणार नाही
Viral Video | एका व्यक्तीला व्हॅक्यूम क्लिनरला समोरे जाणे कसं नडलं आहे, हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळणार आहे, विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेकदा विविध प्रकारचे व्हायरल व्हिडीओ (Trending Video) पाहायला मिळतात. लोकांनी शेअर केलेले व्हिडीओ मजेशीर असतात असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांनी त्या खाली कमेंट केल्या आहेत. तो व्हिडीओ अधिक मजेदार असल्यामुळे लोकांनी तो व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हॅक्यूम क्लिनरसोबत (Vacuum cleaner pulled a set of teeth from the mouth) सामना करीत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे ?
व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेअर सुद्धा केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वयोवृध्द व्यक्ती खुर्चीत बसली आहे. त्यावेळी एका व्यक्तीने त्याच्यासमोर वैक्यूम क्लीनर आणलं आहे. समोर बसलेली व्यक्ती त्या वैक्यूम क्लीनरपासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी त्या व्यक्तीचा चेहरा कशा पद्धतीने हलचाल करीत आहे, हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. काहीवेळी ती व्यक्ती वैक्यूम क्लीनरशी सामना करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्याचवेळी एक मजेशीर गोष्ट घडली आहे. ज्यावेळी ती व्यक्ती आपलं तोडं उघडते,त्यावेळी तिथं असलेले सगळे जोरात हसायला लागतात.
hahahaah pic.twitter.com/CShXS7BQdz
— Enezator (@Enezator) August 22, 2023
दातांचा संपूर्ण सेट खेचून घेतो
वैक्यूम क्लीनरच्या प्रेशरचा सामना करीत असलेली आपलं तोंड उघडते, त्यावेळी वैक्यूम क्लीनर त्यांच्या तोंडात असलेल्या दातांचा संपूर्ण सेट खेचून घेतो. ज्यावेळी दातांचा पूर्ण सेट त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो. हा व्हिडीओ लोकांनी पाहिल्यानंतर याला मजेशीर कमेंट आल्या आहेत. काही लोकांनी अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ कमेंटमध्ये शेअर केले आहेत. त्यामध्ये सुध्दा अशा पद्धतीचा दातांचा नकली सेट बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने कमेंट केली आहे, त्यामध्ये त्याने लिहीलं आहे की,आम्हाला वाटलं की आता दातांचा सेट दारुच्या ग्लासात पडतो का काय?