Kirtan video : कीर्तनाचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. साधूसंतांचे वचन ऐकल्यानंतर आपला दिवसही चांगला जातो. जीवनासंबंधी चांगला उपदेश या माध्यमातून आपल्याला मिळतो. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. कीर्तनाचा (Kirtan) हा व्हिडिओ असून यूझर्सनी चांगलीच पसंती त्यास दिली आहे. श्री क्षेत्र वडगाव लांडगा ता. संगमनेर जि. अहमदनगर येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा हा व्हिडिओ आहे. ह. भ. प. वनिताताई पाटील यांचे हे कीर्तन आहे. पूर्वीच्या काळी महिला जात्यावर जात्यावर धान्य दळायच्या. यावेळी अभंग, ओव्या त्या म्हणायच्या. आधी वासूदेव पहाटे पहाटे यायचा. ईश्वराचे नामस्मरण करायचा. यामुळे आपले आभाळच दुमदुमुन जायचे, असे त्या म्हणाल्या. आता मात्र वासूदेव चित्रात दाखवावा लागतो, असे त्या म्हणाल्या.
अनेकांना सकाळी सकाळी देवपूजा करायचा कंटाळा येतो. पण देवाचा कंटाळा करू नये. असा संदेश त्यांनी दिला. यासाठी त्यांनी एक कथाही ऐकवली. एका कधीच मुलाची ही कथा आहे. वडील गावी जाताना आपल्या मुलाला देवपूजा करायला सांगतात. पण पुढे काय काय होतं? याची ही मजेशीर कथा आहे. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. पण देव त्याला तारतो. त्यामुळे देवाला टाळू नका, असा संदेश या माध्यमातून कीर्तनकार वनिताताई पाटील यांनी दिला.
यूट्यूबवर हे कीर्तन मराठी तडका (MARATHI TADKA) या चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. ‘गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी!’ असे शीर्षक या व्हिडिओला देण्यात आले आहे. 27 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 45k व्ह्यूज मिळाले असून यात वाढच होत आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरने म्हटले आहे, अति उत्तम कीर्तन. आणखी एका यूझरने म्हटले, की वनिताताई तुमची शालीनता आणि सुसंस्कृतपणा राहणीमान खरोखरच आजच्या मुलींनी अंगीकृत करायला पाहिजे. आजच्या पाश्चिमात्य संस्कृती अंगीकृत करून एवढी सुंदर सभ्य भारतीय संस्कृती पोषाख महिला विसरत चालल्या आहेत. यासह अनेक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. (Video courtesy – MARATHI TADKA)