मुंबई: आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा 13 मे ला साखरपुडा पार पडला. राघव चड्ढा आणि परिणिती चोप्राच्या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत राघव आणि परिणिती यांना शुभेच्छा दिल्या. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, असं अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
राघव आणि परिणीतीच्या साखरपुड्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात परिणीती चोप्राचा तोही व्हिडीओ चांगलाच चर्चेत होता ज्यात ती, “मी कधीही कुठल्याही पुढाऱ्यासोबत लग्न करणार नाही” असं म्हणत होती.
परिणीतीच्या त्या व्हिडीओ नंतर आता राघवचा संसदेतील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत राघव संसदेत एका मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत, त्यानंतर भारताचे माजी उपराष्ट्रपती अचानक प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल बोलू लागले. “राघव, मेरे ख्याल से प्यार एक ही होता है ना। एक बार, दसरी बार, फिर ऐसा होता है? नही ना? पहला प्यार ही पहला प्यार होता है”
आता संसदेत उपस्थित असणारे सर्व सदस्य हसू लागले. यावर राघव म्हणाले, “मी तसा अनुभवी नाही सर. अभी जीवन में इतना अनुभव नहीं हुआ है पर अच्छा होता है जितना सुना है”. त्यावर नायडू म्हणाले, ‘पहला प्यार अच्छा होता है, वही हमेशा रहना चाहिए, जिंदगी भर.” आता हा संसदेतील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा अत्यंत भव्य होता. या समारंभाला परिणीती आणि राघव या दोघांचे कुटुंबीय त्यांच्या जवळच्या मित्रांसह उपस्थित होते.साखरपुड्यानंतर अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. साखपुड्याप्रमाणेच चोप्रा – चड्ढा कुटुंबाने परिणीती – राघव यांच्या लग्नाबद्दल मौन बाळगलं आहे.. सध्या बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राघव – परिणीती यांचं लग्न शाही थाटात होणार आहे. दोघांचं लग्न फार रॉयल असणार आहे. लग्नात फक्त जवळच्या व्यक्तींना निमंत्रीत करण्यात येणार आहे. हिवाळ्यात राघव – परिणीती विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राघव – परिणीती यांचं लग्न ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांच्या लग्नात अभिनेत्र प्रियांका चोप्रा देखील उपस्थित राहणार आहे.