विक्की डोनरची कहाणी सत्यात उतरली, तो दानशूर 60 मुलांचा बाप बनला
विकी डोनर चित्रपटाची स्टोरी प्रत्यक्षात ऑस्ट्रेलीयात घडली आहे. येथे एकजण वेगवेगळ्या नावाने स्पर्म डोनेट करून साठ मुलांचा पिता बनला आहे.
सिडनी : असे म्हणतात चित्रपट समाजाचाच आरसा असतात. त्यामुळे समाजात जे घडते तेच चित्रपटात दिसते. तर चित्रपटातील घटनांतून कधीकधी समाज देखील प्रेरणा घेत असतो. असाच प्रकार ऑस्ट्रेलियात घडला आहे. आयुष्यमान खुराना याचा चित्रपट विक्की डोनर जर तुम्ही पाहीला असेल तर त्याची कहानी प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियात घडली आहे. एका व्यक्तीने चक्क अनेक स्पर्म बॅंकांत वेगवेगळया नावाने स्पर्म डोनेट केल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीने आपल स्पर्म वेगवेगळ्या बोगस नावांनी येथील एलजीबीटीक्यू समुदायाला दान केली आहेत. त्या व्यक्तीने बातमीमध्ये उघड करण्यात आलेले नाही. ही व्यक्ती असे गिफ्टच्या बदल्यात केले असून कायद्याने अशाप्रकारे कोणत्याही आमीषाने स्पर्म डोनेट करता येत नाही.
घोटाळा असा उघडकीस आला…
स्पर्म डोनरच्या ग्राहक पालकांसाठी ठेवलेल्या गेट टुगेदरमध्ये एकत्र भेटले तेव्हा अनेकांची मुले एकसारखीच दिसायला असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातील आयव्हीएफ केंद्रांकडून त्या दानशूर व्यक्तीची माहीती काढण्यात आली. तेव्हा हे एकसारखी मुले दिसण्याचे रहस्य उघडले. एकाच व्यक्तीने नावे बदलून अनेक आयव्हीएफ क्लिनिकला स्पर्म दान केल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे.
तो बिगर युरोपीयन वंशाचा
सिडनीच्या फर्टीलिटी फस्ट्रच्या डॉ. एनी क्लार्क यांनी सांगितले की त्या व्यक्तीने आमच्या क्लीनिक मध्ये केवळ एकदाच सेवा दिली, त्या व्यक्तीने दावा केला होता की त्याने फेसबुक ग्रुप्सच्या माध्यमाने अनेकदा स्पर्म डोनेट केले आहे. आम्हाला माहीती आहे त्याला त्या बदल्यात अनेक गिफ्ट मिळालेले असतील, जे बेकायदेशीर आहे. त्याला पकडता आले कारण तो बिगर युरोपीयन वंशाचा असून येथील रहिवासी नाही.
स्पर्मच्या बदल्यात गिफ्ट स्वीकारणे बेकायदेशीर
अनेक देशांप्रमाणे ऑस्ट्रेलियातही मानवी स्पर्मच्या बदल्यात गिफ्ट स्वीकारणे ह्युमन टीश्यू एक्ट नूसार बेकायदेशीर आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास पंधरा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतू फेसबुकच्या माध्यमातून पालकांना डोनरशी थेट संपर्क होत असल्याने बेकायदा डोनेशनची प्रकरणे वाढली आहेत.
युकेच्या कायद्याप्रमाणे ह्युमन फर्टीलायझेशन एंड एब्रेयोलॉजी अथॉरीटी नूसार स्पर्म दानाच्या बदल्यात कोणत्या प्रकारचा मोबदला घेणे गुन्हा आहे. डोनर आपल्या प्रत्येक क्लिनिक व्हीजिटकरीता 35 पौंड मिळवू शकत आहेत. एका व्यक्तीचे स्पर्म कमाल दहा कुटुंबाना दिले जाऊ शकते, अर्थात त्या परिवारांना होणाऱ्या मुलांच्या संख्येबाबत कायद्यात काही म्हटलेले नाही.