Video: मेट्रोमध्ये अचानक घुसली भूल भुलैयाची मंजुलीका, प्रवाशांची झाली पळापळ
ही मुलगी हुबेहुब विद्या बालनच्या भूमिकेसारखी दिसत होती. तिने आधी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. एक मुलगा तर इतका घाबरला त्याने तिथून थेट..
नवी दिल्ली, आजकाल लोकांना इंस्टाग्राम रील्स (Manjulika Instagram reels) इतके आवडतात की ते जिकडे पाहावे तिकडे लोक रील्स बनवू लागतात. काही लोकांनी मेट्रोही सोडली नाही. लोक मेट्रोमध्ये विचित्र व्हिडिओ बनवू लागले आहेत. याशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. आता मेट्रोचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे पण तो काहीसा वेगळा आहे. हा व्हिडिओ नोएडा मेट्रोचा आहे. रोजच्या प्रमाणे लोक मेट्रोने प्रवास करत असताना अचानक एक मुलगी ‘भूल भुलैया’च्या गेटअपमध्ये त्यांच्या कोचमध्ये घुसली आणि लोकांना घाबरवू लागली.
बालनच्या भूमिकेसारखी दिसत होती मुलगी
ही मुलगी हुबेहुब विद्या बालनच्या भूमिकेसारखी दिसत होती. तिने आधी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. एक मुलगा तर इतका घाबरला त्याने तिथून थेट पळच काढला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. काहींनी मंजुलिकाच्या भूमिकेत मुलीने चांगला अभिनय केल्याचे सांगितले, तर काहींनी सार्वजनिक वाहतूक मेट्रोमध्ये अशा कृत्यांवर टीका केली.
View this post on Instagram
कारवाई होणार?
हा व्हिडिओ नोएडा मेट्रोचा आहे, जिथे एक मुलगी ‘भूल भुलैया’ चित्रपटाची मंजुलिका बनून मेट्रोमध्ये उपस्थित लोकांना घाबरवत होती. त्याचा व्हिडिओ लोकांसमोर येताच तो झपाट्याने व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रविवारचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू असून लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.