VIDEO : जाळ्यात अडकला कावळा, शाळकरी मुलाने वाचवला जीव, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…
ज्यावेळी त्या कावळ्याची सुटका झाली, त्यावेळी तिथं असलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या. ज्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. दयाळू हृदय असंख्य जीवनांना स्पर्श करते.
मुंबई : सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेले प्राण्याचे व्हिडीओ (animal video) लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात. तर प्राण्यांनी केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ असतात. दोन्ही पद्धतीचे व्हिडीओ लोकांना पाहायला आवडतात असं अनेकदा दिसून आलंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो अधिक लोकांच्या पसंतीला सुध्दा पडला आहे. त्यामध्ये जाळ्यात अडकलेल्या एका कावळ्याला शाळेचा मुलगा प्रेमाने त्यातून बाहेर काढत आहे. हा सगळा प्रकार तिथं असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये (mobile video) कैद केला आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या सुध्दा लक्षात येईल.
शाळेच्या परिसरात कावळा फसल्याचे दिसले
व्हायरल झालेल्या व्हिडीओला सबिता चंदा नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केलं आहे. विशेष ती व्हिडीओ खूप लहान आहे. त्यामध्ये एक शाळकरी मुलगा जाळ्यात फसलेल्या कावळ्याची मदत करीत आहे. ज्यावेळी त्याला शाळेच्या परिसरात कावळा फसल्याचे दिसले, त्यावेळी तो त्या दिशेने धावला आणि कोवळ्याची त्याच्यातून सुटका केली. सुटका केल्यानंतर पाहत असलेल्या शाळेतील मुलांना सुध्दा अधिक आनंद झाला.
व्हिडीओ 41 हजार लोकांनी पाहिला
ज्यावेळी त्या कावळ्याची सुटका झाली, त्यावेळी तिथं असलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या. ज्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. दयाळू हृदय असंख्य जीवनांना स्पर्श करते.आतापर्यंत हा व्हिडीओ 41 हजार लोकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अधिक पसंत आला आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्या विद्यार्थ्याचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, किती संवदेनशील आणि विचारशील मुलगा आहे.
A compassionate heart touches countless lives.❤️? pic.twitter.com/93XKNckU0n
— Sabita Chanda (@itsmesabita) March 1, 2023
प्राणी मित्रांनी आतापर्यंत अनेक प्राण्यांना जीवदान दिले आहे. त्याचबरोबर अडकलेल्या प्राण्यांची सुटका केली. त्यांचे सुद्धा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.