मुंबई: सोशल मीडियावर रोज तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. डान्स, गाणे, प्रॅन्क, वेगवेगळे पक्षी, प्राणी असे अनेक पद्धतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडिया हा लोकांसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. लोक सुद्धा याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. व्हिडीओ जर हटके असेल तर काहीच वेळात तो व्हायरल होतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ सुद्धा खूप असतात. अगदी कुत्र्या, मांजरापासून जंगली प्राण्यांपर्यंतचे व्हिडीओ यात असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो व्हिडीओ सरड्याचा आहे. यात एक व्यक्ती एका सरड्याला चक्क CPR देऊन वाचवलंय. आहेना आश्चर्यकारक? बघुयात काय आहे व्हिडीओमध्ये…
CPR देतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. यात सगळ्यात जास्त समावेश असतो तो माणसांना CPR दिल्याचा. कित्येकदा एखाद्याचा जीव जाता-जाता CPR देऊन वाचवला जातो. हे सगळं ठीक पण सरड्याला CPR दिल्याचं पाहिलंय का? होय. एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक माणूस एका सरड्याला मरता-मरता वाचवतोय. व्हिडीओच्या सुरवातीला तो सरडा जमिनीवर बेशुद्ध दिसतो. एक व्यक्ती त्या सरड्याला उचलते तरीही तो सरडा शुद्धीत येत नाही. मग तो माणूस त्या सरड्याला CPR देतो, तोंडाने श्वास द्यायचा प्रयत्न करतो तरीही काही होत नाही. भरपूर प्रयत्नानंतर तो सरडा नीट होतो.
He is amazing!pic.twitter.com/IVdDqn14pU
— Figen (@TheFigen_) October 10, 2023
हा सरडा बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेला असतो. एक माणूस तिथे जातो आणि त्याला CPR देतो. तो माणूस त्या सरड्याला उचलून बाटलीत टाकतो आणि त्या सरड्याचा जीव वाचवतो. हा व्हिडीओ विचित्र वाटतो पण बघताना, “माणुसकी अजूनही जिवंत आहे” असं वाटू लागतं. माणसाला CPR देऊन वाचवलं हे तर तुम्ही नेहमीच पाहत असाल पण सरड्याला CPR तुम्ही पहिल्यांदाच बघाल.