Video : नवरदेव घोड्यावर, घोड्याला उचलून वऱ्हाडी नाचले, अनोख्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मिडीयावर एक लग्नाचा मजेशीर व्हिडीयो व्हायलर होत आहे. असा धाडसी 'घोडा डान्स' तुम्ही कधी पाहीला नसेल. लोक व्हायरल डान्सवर मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत.
मुंबई : लग्नाची मिरवणूक हटके करण्यासाठी वधू-वराची मित्रमंडळी काय करतील याचा काही नेमच राहीला नाही. मागे काही दिवसांपूर्वी नवरदेवाला चक्क बाईकवर बसवून त्याला त्या बाईकसह उचलून करण्यात आलेला ‘स्लेन्डर डान्स’ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल झाला होता. आता चक्क नवरदेवालाच घोड्यावर बसवून या घोड्याला एका पलंगावर उभा करीत तो पलंगच उचलून नवरदेवाच्या मित्रमंडळींनी केलेल्या मजेशीर डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर ravirajsinh_rajput_0007 या अकाउंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चारपायीवर घोड्यासह नवरदेवाला उचलून मित्रमंडळी गोल-गोल फिरवत आहेत. नवरदेव बिचारा घाबरून घोडीला घट्ट पकडून बसलेला दिसत आहे. कारण घोडी बिथरली असती तर नवरदेवासह सर्वांचीच पंचाईत झाली असती आणि मजा म्हणून केलेला हा स्टंट जीवघेणा देखील ठरला असता. या व्हिडीओत घोडी बिथरून जाऊ नये म्हणून तिला सांभाळणारा देखील त्या खाटे सदृश्य चारपायीवर उभा असलेला दिसत आहे. या क्लिपला पाहून युजर आश्चर्यचकीत झालेले दिसत आहेत. या क्लिप पाहून युजर त्यांना वेडे म्हणत आहेत.
हा पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
या क्लिपला 8 लाखाहून अधिक जणांनी पाहीले आहे. 1 लाख 39 हजार जणांनी लाइक्स केले आहे. एका युजरने म्हटले आहे की आता हेच पाहायचे राहीले होते. तर एका युजरने म्हटलंय यांच्यातील एक तरी अर्धा शहाणा असायला हवा होता. तर एक युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की नशीब घोडी बिथरली नाही अन्यथा या चारपायीवरुनच जखमींना दवाखान्यात न्यावे लागले असते. तर एकाने म्हटले घोडीने जरा जरी हुशारी दाखवली असती तर हा व्हिडीओ कॉमेडी व्हिडीओ बनला असता.