Video: बेबी तू आला नाहीस… तिचं काळजाला हात घालणारं वाक्य… शहीदाच्या अंतयात्रेत सर्वांच्याचे डोळे पाणावले
शहीद वैमानिक सिद्धार्थ यादवच्या अखेरच्या निरोपाच्या वेळी त्याची होणारी पत्नी सोनिया आणि त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. जग्वार अपघातात 28 वर्षीय सिद्धार्थ शहीद झाला होता. 2 नोव्हेंबरला त्यांचे लग्न होणार होते.

‘बेबी तू मला घ्यायला आला नाहीस… मी तुला घ्यायला येतो असं तू म्हणाला होतास…’ शहीद वैमानिक सिद्धार्थच्या पार्थिवाच्या समोर त्याची होणारी पत्नी सोनिया रडताना हे बोलत होती. तिचे रडणे पाहून शेजारी उभ्या असलेल्या हवाई दलाच्या जवानांनाही अश्रू अनावर झाले आहेत. या घटनेविषयी कळाल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावले होते. आता सिद्धार्थ यादवने जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आपल्या मुलाला निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाला होता. लेफ्टनंट पायलट सिद्धार्थ यादव केवळ 28 वर्षांचा होता. हरियाणाच्या रेवाडीच्या भालखी माजरा गावातील 28 वर्षीय पायलट सिद्धार्थ यादव गुजरातच्या जाम नगरमध्ये जगुआरजेट फायटर अपघातात शहीद झाला. शुक्रवारी त्याचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचले आणि येथे त्याला लष्करी सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला. सोनियाही आपल्या होणाऱ्या पतीला निरोप देण्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती. त्याच्या मृतदेहाजवळ ती रडत होती. सिद्धार्थ आणि सोनियाचा 23 मार्च रोजी साखरपुडा झाला होता. 2 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचे लग्न होणार होते. मात्र, आपल्या मुलाला नवरदेवाच्या पोशाखात पाहण्याचे आई आणि वडिलांचे स्वप्न भंगले.




वाचा: पोलीस अधिकारी पीडित महिलेच्या प्रेमात, खोलित घेऊन गेला… सर्व मर्यादा ओलांडल्या, आता लग्नासाठी…
शुक्रवारी वडील सुशील यादव यांनी त्यांच्या मूळ गावी भालखी माजरा येथे 28 वर्षीय शहीद मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी हवाई दलाच्या ताफ्याने गोळीबार करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ 2 एप्रिल रोजी जामनगर येथील जग्वार अपघातात शहीद झाला. शहीद होण्यापूर्वी त्याने आपल्या साथीदाराचे प्राण वाचवले. शुक्रवारी सकाळीच त्यांचे पार्थिव रेवाडी येथील त्यांच्या नवीन घरी आणण्यात आले, त्यानंतर त्याची अंतिम यात्रा काढण्यात आली.
सबसे ज्यादा अखरता है शहीदों का जाना! हरियाणा के रेवाड़ी के शहीद पायलट सिद्धार्थ की मंगेतर सोनिया ने उन्हें रोते रोते विदाई दी.#airforce @IAF_MCC #jamnagar #fighterjet pic.twitter.com/fbGqL5oNE4
— Vinod Katwal (@Katwal_Vinod) April 4, 2025
१० दिवसांपूर्वीच झाली झाला होता साखरपुडा
अंत्यसंस्कारासाठी त्याची होणारी पत्नी स्मशानभूमीत पोहोचली होती. ती मृतदेहाकडे पाहून रडत राहिली आणि वारंवार म्हणाली, “कृपया एकदा मला त्याचा चेहरा दाखवा.” सानिया म्हणाली, “मला सिद्धार्थचा अभिमान आहे.” 2 नोव्हेंबरला सिद्धार्थचे लग्न होणार होते, त्यासाठी घरी जोरदार तयारी सुरू होती.
तीन दिवसांपूर्वी सुट्टीवरून परत
सिद्धार्थ यादव 2017 मध्ये हवाई दलात दाखल झाला होता. सिद्धार्थचे वडील सुशील कुमार हवाई दलातून निवृत्त झाले होते. तर आजोबा रघुबीर सिंग यांनी भारतीय सैन्यात नोकरी केली होती. त्यांच्या कुटुंबात त्याच्या आई-वडिलांशिवाय एक लहान बहीण खुशी आहे. सिद्धार्थ हा अपघात होण्यापूर्वी 31 मार्च रोजी घरून ड्युटीवर परतला होता.