VIDEO : ट्रकच्या टायराच्या बाजूला झोपायची व्यवस्था, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ट्रकच्या चाकाच्या बाजूला एक व्यक्ती निवांत झोपली. शेजारी जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय पाहायला मिळेल, हे सध्यातरी कोणीचं सांगू शकत नाही. कारण रोज असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर (trending video) पाहायला मिळतात. त्यामध्ये जे व्हिडीओ हटके असतात, तेचं व्हिडीओ लोकांना पाहायला मिळतात असं पाहायला मिळालं आहे. मजेशीर व्हिडीओ लोकं पुन्हा पुन्हा पाहतात असं देखील झालं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती ट्रकच्या टायरच्या बाजूला झोपली आहे. इतकी रिस्क घेऊन आयुष्य जगत असलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोकांनी त्या व्हिडीओ (truck jugaad video) अनेक कमेंट केल्या आहेत.
ट्रक एकदम स्पीडने निघाला आहे
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जुगाड करुन आपली झोप पूर्ण करीत आहे. त्या व्यक्तीने ट्रकच्या खालच्या बाजूला जुगाड करुन पलंग तयार केला आहे. तो ट्रक एकदम स्पीडने निघाला आहे. ती व्यक्ती एकदम निवांत झोपली आहे. त्या व्यक्तीला शेजारी किंवा रस्त्यावर काय सुरु आहे, हे सुध्दा कळत नाही. ज्यावेळी त्या व्यक्तीला शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिले, त्यावेळी पाहणाऱ्या व्यक्तीला सुध्दा धक्का बसला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे.
व्हिडीओ संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत
शेजारुन जाणाऱ्या एका बाईक चालकाने हा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला इंस्टाग्रामवरती @tircilar_ailesi या व्यक्तीने शेअर केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ शूट करीत असताना त्या व्यक्तीने व्हिडीओला, तुम्ही असा बेडरुम कधीचं पाहिला नाही असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत तीन लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओ संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
View this post on Instagram
काही नेटकऱ्यांनी लिहीलं आहे की, समजा त्या गाडीचा टायर फुटला तर काय होईल. दुसऱ्या एकाने लिहीलं आहे की, अशा पद्धतीचा जुगाड मोठा खतरनाक असतो. तिसऱ्या व्यक्तीने लिहीलं आहे की, अचानक एका व्यक्तीनं ब्रेक मारला तर काय होईल. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.