मुंबई : कोरोना (corona) आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये (lockdown)अनेकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागता. या काळात शाळा, (School) कॉलेज बंद होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना दोनवेळच्या खाण्याची भ्रांत होती. या परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढून नये आणि त्याचा मुलांना त्रास होऊ नये, यासाठी शाळा बंद करण्यात आल्या. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आलं. दरम्यान, शाळेत न गेल्यानं एक प्रवाह विद्यार्थ्यांना हिणवण्याचाही पहायला मिळाला. कोविड बॅच म्हणून देखील विद्यार्थ्यांना हिणवण्यात आलं. याच आशयावर प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका(Harsh goenka) यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका विद्यार्थीनीचा असून तिनं कोरोनाकाळातील विदयार्थ्यांना कसं हिणवलं गेलं, कोरोनात घरातील परिस्थिती काय होती, याविषयी त्या विद्यार्थीनीनं सांगितलंय. यावेळी प्रत्यक्ष अनुभव आणि पुस्तकी ज्ञान याची तुलना देखील या विद्यार्थीनीनं केली आहे.
What the young Covid generation is going through ? so well expressed….pic.twitter.com/pWzg0xJo2y
— Harsh Goenka (@hvgoenka) March 11, 2022
विद्यार्थी पास झाल्यावर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना बोलावतात, त्यावेळी एक विद्यार्थीनी शाळेच्या व्याससीठावरुन भाषण देताना म्हणते की, अम्हाला कोविड बॅच म्हणून ओळखतात. असं आम्हाला अनेकदा म्हटलं जातं. मात्र, आज आम्ही सर्व विद्यार्थी पास होत आहोत. धन्यवाद शिक्षकांना, आई-बाबा आम्हाला कोरोनाकाळात सहन करण्यासाठी. तेही ऑनलाईन सहन करण्यासाठी. अनेकांना असंही वाटतंय की हे विद्यार्थी कधीही शाळेत न जाता, कोणतंही प्रॅक्टिकल न करता पास झाले आहेत. आता हे विद्यार्थी लिहिणार. दिवसभर घरीच असायचे, असं लिहिणार का. पण त्या लोकांना हे माहीत नाही की आम्ही काय लिहिणार आहोत. मी लिहिणार की, पैसे कापण्यात आले तरीही माझी फी पूर्ण भरण्यात आली. आईला एका क्षणासाठीही बसलेलं मी पाहिलं नाही. वडिलांना ऑक्सिजन सिलिंडरमधून श्वास घेताना पाहिलं. त्यावेळी देखील माझ्या वडिलांना माझ्या शिक्षणाची चिंता होती. जेव्हा पूर्ण जगाला माहीत नव्ह्तं उद्या काय होणार. त्यावेळी आमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आमच्या पालकांनी कोणतीही कसर सोडली नाही. आणि हे जे आम्ही त्यांच्याकडून शिकलो हे कोणतंही पुस्तक नाही शिकवू शकत, असं ती विद्यार्थीनी म्हणते. प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ कोरोनाकाळातील विद्यार्थ्यांना ज्या संकटांना सामोरं जावं लागलं. त्याविषयीचे अनुभव विषद करतो.
इतर बातम्या