Viral Video: आलियाच्या डोहाळ जेवणात एडीटरची बनवा-बनवी, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.

हे गाणं पाहाताना तुम्हाला खरंच आलियाचं डोहाळ जेवण झालं तर कसं असेल याचा फील आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच हा व्हिडीओ अल्पावधीत इंटरनेटवर व्हायरल झालेला पाहायला मिळतो आहे.

Viral Video: आलियाच्या डोहाळ जेवणात एडीटरची बनवा-बनवी, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.
कुणी तरी येणार ग म्हणत आलियाचं डोहाळ जेवणाचा एडिटेड व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 5:31 PM

आपल्याकडे कसलं काय करतील हे सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतो आहे. जो व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ आहे आलियाच्या डोहाळ (Alia Bhatt Dohal Jevan) जेवणातला. खराखुरा नाही तर एडीटेड, थोडक्यात बनवा-बनवी करुन बनवलेला. बनवा-बनवी (Ashi Hi Banva Banvi) चित्रपटातील कुणीतरी येणार गं..या गाण्यावर भन्नाट एडिटींग करण्यात आली आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर लग्नबंधनात अडकले, आणि त्यानंतर आता आलिया लवकरच आई होणार आहे. आलिया-रणबीरने सोशल मीडियातून ही बातमी दिली होती. आलियाचे बेबी बंपचे फोटोही व्हायरल झाले. आता या बातमीनंतर आपल्याकडील नेटकऱ्यांची क्रिएटीव्हीटी बाहेर नाही पडली तर नवलच

फेसबूकवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यात कुणीतरी येणार ग या गाण्यातील डोहाळ जेवणाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. जिथं लक्ष्मीकांत यांच्या चेहऱ्यावर आलियाचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. तर घरमालकीनीच्या चेहऱ्यावर नीतू सिंग यांचा चेहरा मॉर्फ केला आहे. या डोहाळ जेवणात प्रियंका, कतरिना आणि दीपिका पादुकोन नृत्य करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे, अशोक सराफ ज्यांनी या चित्रपटात मानेंची भूमिका केली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर चक्क रणबीर कपूरचा मॉर्फ केलं आहे. हेच नाही तर फोटोग्राफरच्या चेहऱ्यावर आलिया भटचे वडील महेश भट यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ:

हे गाणं पाहाताना तुम्हाला खरंच आलियाचं डोहाळ जेवण झालं तर कसं असेल याचा फील आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच हा व्हिडीओ अल्पावधीत इंटरनेटवर व्हायरल झालेला पाहायला मिळतो आहे.

कुठल्याही कलाकृतीला तसं मॉर्फ करणं चुकीचंच. पण त्या कलाकृतीतून कुणाचीही बदनामी न करता हास्य निर्माण करण्यासाठी नेटकऱ्यांनी या एडिटरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आतापर्यंत 7 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तब्बल 21 हजाराहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. इतकंच नाही यावर शेकडो कमेंटस आहेत. ज्यामध्ये लोकांनी या एडिटरच्या क्रिएटीव्हीटीला दाद दिली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.