कोवळ्या वयात भर उन्हात सॉक्सविक्री, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी मदत, सोशल मीडियावर अनेकांनी ठोकला सलाम

एक मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अमरिंदर सिंग यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (boy selling socks on road captain amarinder singh)

कोवळ्या वयात भर उन्हात सॉक्सविक्री, मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' मोठी मदत, सोशल मीडियावर अनेकांनी ठोकला सलाम
BOY SELLING SOCKS ON ROAD
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 6:04 PM

चंदीगड : मुख्यमंत्री म्हटलं की आपल्यासमोर आलीशान गाडी, अधिकाऱ्यांचा ताफा आणि व्यस्त जीवनपद्धती असं काहीसं चित्र उभं राहतं. मात्र, काही मुख्यमंत्र्यांचं त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने लक्ष असतं. काही चुकीचं आढळल्यास ते तत्परतेने गोष्टी सुदरवण्यासाठी पुढे येतात. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Punjab CM Captain Amarinder Singh) यांनीसुद्धा अशीच काहीशी तत्परता दाखवली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सगळीकडे कौतूक होतेय. त्यांनी एक मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. (video of boy selling socks on road goes viral on social media Punjab CM Captain Amarinder Singh helped him)

अमरिंदर सिंग यांनी मुलाला सोशल मीडियावर पाहिलं

मुलं ही देवाघरची फुलं असतात. असं म्हणतात की त्यांच्यावर योग्य वयात योग्य संस्कार केले तर त्यांचा बैद्धिक विकास होतो. तसेच त्यांना शाळेत घातल्यानंतर त्यांच्या सर्वांगीन विकासास चालना मिळते. मात्र, सध्या देशात अशी काही मुलं आहेत, ज्यांना शाळेपासून वंचित राहावं लागत आहे. घऱची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कोवळ्या वयात त्यांना काम करावं लागतंय. पंजाबमधील अशाच एका मुलाचा व्हिडीओ कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पाहिला. तो पंजाबच्या लुधियाना शहरामध्ये रस्त्यावर चक्क सॉक्स विकत होता. भर उन्हात सॉक्स विकतानाचा त्याचा व्हिडीओ पंजाबमध्ये समाजमाध्यमावर पसरला होता. नंतर या व्हिडीओची दखल थेट अमरिंदर सिंग यांनी घेतली.

मुलाला शाळेत पाठवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

हा मुलगा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत त्याच्याशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संवाद साधला. तो दहा वर्षांचा असून इयत्ता दुसरीमध्ये शिकत असताना त्याला शाळा सोडावी लागली. शाळा सोडून तो रस्त्यावर सॉक्स विकत होता. अमरिंदर सिंग यांनी या मुलाशी संवाद साधत त्याला शाळेत जाण्यास सांगितले. त्याच्या अ‌ॅडमिशनची व्यवस्था करण्याचे आदेश तेथील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अमरिंदर यांनी मुलाच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मदत म्हणून दिले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची वाहवा

दरम्यान, एका सॉक्स विकणाऱ्या कोवळ्या मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत केल्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची वाहवा होत आहे. सोशल मीडियावर त्यांचे तोंडभरुन कौतुक केले जातेय. त्यांच्या या कर्याला अनेकांनी सलाम ठोकलाय.

इतर बातम्या :

Video | सारखा ड्रेस, सारखे हावभाव ; जुळ्या बहिणींचा मिरर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | शहरात अडकलेल्या राजाची घालमेल, म्हणतो “काय सांगू राणी मला गाव सुटेना”; कवितेची महाराष्ट्रभर चर्चा

Video | घरासमोर येताच आकाश उजळलं, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, नव्या नवरीची ‘रॉयल एन्ट्री’ पाहाच

(video of boy selling socks on road goes viral on social media Punjab CM Captain Amarinder Singh helped him)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.