चिंपाझी आणि वाघाच्या बछड्यांची अनोखी दोस्ती, व्हिडिओ पाहून मूड फ्रेश होईल
एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिंपाझी आणि दोन वाघाचे बछडे एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की व्हिडिओ पाहून युजर्सचा मूड फ्रेश होत आहे.
सोशल मीडियावर वाईल्ड अॅनिमलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही थरारक असतात. मात्र लोकांना वाईल्ड लाईफचे व्हिडिओ (Wild Life Video) पहायला प्राणी मित्रच नाही तर सर्वांनाच फार आवडतात. सोशल मीडियावर अशा व्हिडिओला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज प्राप्त होतात. असाच एका अभयारण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral on Social Media) धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ चिंपाझी आणि वाघाच्या बछड्यांचा खेळतानाचा (Chimpanzee plays with Tiger Cubs) आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये ?
एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिंपाझी आणि दोन वाघाचे बछडे एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की व्हिडिओ पाहून युजर्सचा मूड फ्रेश होत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओने सोशल मीडियाला युजर्सला चांगलीच भुरळ घातली आहे. या व्हिडिओला युजर्सने अधिक पसंती दर्शवली आहे. अनेक लाईक्स आणि व्ह्यूज या व्हिडिओला मिळत आहेत. व्हिडिओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल.
व्हिडिओमध्ये अंगद नामक चिंपाझी वाघाच्या बछड्यांजवळ जात त्यांना गोंजारताना दिसत आहेत. सुरवातीला एक बछडा त्याला जवळ येऊ देत नाही. मात्र नंतर चिंपाझी त्याला जवळ घेतो. चिंपाझी आणि बछड्यांचा सुंदर पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नकळत हसू येईल.
बालपणीच्या मैत्रीचे एक अनोखे उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव होत आहेत. तर दुसरीकडे खतरनाक वाईल्ड लाईफचा हा व्हिडिओ पाहून लोक हैराणही झाले आहेत.