Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कोरोनामुक्त झालेल्या तरुणाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थिरकणार !

गुहागरमधील अशाच एका कोरोनामुक्त झालेल्या तरुणाचा आनंद सध्या चर्चेचा विषय बनतो आहे. (corona patient dancing video)

Video | कोरोनामुक्त झालेल्या तरुणाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थिरकणार !
GUHAR CORONA PATIENT DANCE VIDEO
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 10:48 PM

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. रोज लाखो रुग्ण नव्याने आढळत असल्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजनची अनेक राज्यांत कमतरता भासत आहे. याच कारणामुळे देशासह महाराष्ट्रात मृतांचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे कोरोनाचे हे भयावह चित्र असताना मात्र दुसरीकडे काही दिलासादायक आणि ताणव कमी करणाऱ्या घटना समोर येत आहेत. कोरोनामुक्त झाल्यामुळे अनेकांना आपला आपला आनंद गगनात मावेनासा झालाय. गुहागरमधील अशाच एका कोरोनामुक्त झालेल्या तरुणाचा आनंद सध्या चर्चेचा विषय बनतो आहे. त्याने धडाकेबाज नृत्य करुन दुसऱ्या कोरोनाग्रस्तांचे (Corona patient) नमोरंजन केले आहे. त्याने नृत्य केलेला व्हिडीओ सध्या समाजमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात फिरतो आहे. (video of Corona patient dancing in Guhagar Covid centre goes viral)

तरुणांने डान्स करुन कोरोनाग्रस्तांचं मन जिंकलं

गुहागर येथील एका कोविड सेंटरमध्ये काही कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. कोरोनावर उपचार घेत असल्यामुळे साहजकिच या रुग्णांमध्ये थोडा तणाव जाणवत होता. याच कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये एक तरुणसुद्धा होता. त्याच्यावर रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी यशस्वी उपचार केले. शनिवारी (01 मे) त्याच्यावरचा उपचार पूर्ण झाल्यामुळे त्याला आज कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त झाल्यामुळे त्याला खूप आनंद झाला. मात्र, कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या इतरांना या तरुणाच्या नृत्यकलेबद्दल समजले. त्यांनंतर या तरुणाने इतर कोरोनाग्रस्तांचा तणाव कमी व्हावा तसेच मानसिक स्वस्थ टिकून राहावे म्हणून  कोविड सेंटरमध्येच नृत्य सादर केले.

पाहा तरुणाच्या डान्सचा व्हिडीओ :

दरम्यान, या तरुणाच्या अंगावर पीपीई कीट असुनसुद्धा त्याने धडाकेबाज नृत्य सादर केले. त्याच्या नृत्य सादरीकरणामुळे बाकीच्या कोरोनाग्रस्तांनीसुद्धा ठेका धरला होता. नृत्य सादर करताना डॉक्टर्स तसेच इतर आरोग्य कर्मचारी त्याला प्रोत्साहन देत होते. तरुणाच्या या डान्सची सध्य़ा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

इतर बातम्या :

पीपीई कीट घातल्यानंतर काय होतं ? डॉक्टरांना मारहाण करण्यापूर्वी ‘हा’ फोटो पाहाच

Video | कोविड वॉर्डमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या नर्सची देशभरात चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सॅल्यूट ठोकाल

Video | कोरोनाग्रस्त तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “कोरोनासे नही, इस ‘विदेशी पंखेसे’ डर लगता है साहेब !”

(video of Corona patient dancing in Guhagar Covid centre goes viral)

अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा.
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं.
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.