VIDEO : कुत्र्याला मास्क घालून खांद्यावर घेतलं, म्हणाला “मी स्वतः मरेल, पण ‘पुरु’ला मरु देणार नाही”

आपल्या कुत्र्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा ठरलाय

VIDEO : कुत्र्याला मास्क घालून खांद्यावर घेतलं, म्हणाला मी स्वतः मरेल, पण 'पुरु'ला मरु देणार नाही
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 6:30 PM

Dog Viral Video : कोरोना विषाणूचा (Corona virus Pandemic) वाढता संसर्ग पाहता अनेकांना आपल्या सोबत लाडक्या पाळीव प्राण्यांचीही काळजी वाटत आहे. त्यामुळेच अनेकजण या पाळीव प्राण्यांचीही चांगलीच निगा राखत आहेत. पाळीव प्राण्यांचा पालनपोषण करताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही घ्यावी लागते. म्हणूनच ही काळजी घेतली जात आहे. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्र्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. कुत्र्याला सर्वात प्रामाणिक प्राणी समजलं जातं (Dog With Mask). त्यामुळेच अनेक लोक त्याला जीवापेक्षा अधिक जपतात. असंच आपल्या कुत्र्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा ठरलाय (Video of Dog wearing a mask and sitting on shoulder of man amid Corona virus Pandemic).

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या व्हिडीओत कुत्र्याच्या मालकाने स्वतः मास्क न घातला ते मास्क कुत्र्याला घातलं. असं का केलं अशी विचारणा झाल्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकूण अनेकांना त्याच्या कुत्र्याविषयीच्या भावनांविषयी सहानुभुती वाटली (Dog Wearing Mask). अनेकांना हा व्हिडीओ खूपच आवडला. त्यामुळेच लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत (Viral Video). इंटरनेटवर हा व्हिडीओ सेंशेसन बनलाय. व्हिडीओतील गरीब व्यक्ती आपल्या कुत्र्याला मास्क घालून खांद्यावर घेऊन फिरत असल्यानं लोकांना त्याच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झालीय. तसेच तो खरा प्राणी प्रेमी असल्याचंही लोक म्हणत आहेत.

कुत्र्याच्या तोंडाला मास्क घालून खांद्यावर

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत संबंधित व्यक्तीने कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग आपल्या कुत्र्याला होऊ नये म्हणून स्वतः मास्क घालता कुत्र्याला मास्क घातलाय. हे पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती त्याला त्याचं नाव विचारतो. तसेच कुत्र्याचंही नाव विचारतो. यावेळी तु स्वतः मास्क न घालता कुत्र्याला मास्क का घातला आणि त्याला खांद्यावर घेऊन का फिरत आहेस असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या गरीब व्यक्तीने दिलेली उत्तरं अनेकांना भावनिक करुन गेली. तसेच एखादा व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यावर किती प्रेम करु शकतो याचंही हे उदाहरण असल्याचं लोक म्हणत आहेत.

उत्तर ऐकून अनेकजण भावूक

खांद्यावर कुत्र घेऊन जात असलेल्या व्यक्तीला त्याचं नाव विचारण्यात आलं. त्यावर त्याने स्वतःचं नाव मोहन लाल देवांगन असं सांगितलं. कुत्र्याचं नाव विचारलं असता त्याने कुत्र्याचं नाव पुरु असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या मोहनलालला तु स्वतः मास्क न घातला कुत्र्याला मास्क का घातला हे विचारलं असता त्याने डोळ्यात पाणी आणणारं उत्तर दिलं. तो म्हणाला, “मी स्वतः मरेन पण याला मरु देणार नाही. ते माझं मुल आहे. लहानपणापासून त्याला पाळलंय.”

हेही वाचा :

Video : आता कुत्रे कोरोनाचा शोध घेणार, थायलंड विद्यापीठाचा दावा, पहा प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ

नि: शब्द ! मालकाच्या शोधासाठी कुत्रा दोन दिवसांपासून तपोवन टनलबाहेर उभा, बचाव पथकाचे जवानही हैराण

इमानदार ! मालक हॉस्पिटलमध्ये, दोस्तानं गेटवर ठाण मांडलं !

व्हिडीओ पाहा :

Video of Dog wearing a mask and sitting on shoulder of man amid Corona virus Pandemic

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.