मृत्यू थोडक्यात हुकला; भयानक वाऱ्याचा झोत अन् विमान हवेतच फिरलं; फेंगल चक्रीवादळाचा धडकी भरवणारा
फेंगल चक्रीवादळाचे अनेक ठिकाणी भयानक पडसाद उमटलेले पाहायला मिळतात.फेंगल चक्रीवादळाचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.चक्रीवादळाचा परिणाम म्हणून लॅंड होण्यासाठी जमिनीजवळ आलेलं विमान हे थेट हवेतच पलटी मारणार होतं पण थोडक्यात मृत्यू हुकल्याचे चित्र दिसत आहे.
फेंगल चक्रीवादळाचे अनेक ठिकाणी भयानक पडसाद उमटलेले पाहायला मिळतात. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यातच आता फेंगल चक्रीवादळाचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. हे वादळ आता पुद्दुचेरी आणि तामिळनाडूजवळच्या किनारपट्टीच्या भागात धडकलं आहे. त्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील काही भाग आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. इथे ताशी 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नईच विमानतळही पहाटे 4 वाजेपर्यंत बंद करण्यात आलेत.
बापरे विमान थेट तिरकं
त्यापूर्वी चेन्नईच विमानतळावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चक्रीवादळामुळे विमानाला लँडिंगसाठी अडचण येत असल्याचे दिसत आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 निओ विमानाचा व्हिडिओ असून व्हिडीओमध्ये एक जोरदार हवेच्या झोतामुळे हे विमान चक्क हवेतच पलटी मारणार होतं मात्र थोडक्यात हा प्रसंग टळला असून कोणतीही दुर्घटना झाली नाही.
त्यामुळे जमिनीच्या जवळ आलेल्या विमानाला शेवटच्या क्षणी लँडिंग कॅन्सल करावं लागलं. लँडिंग करताना या विमानाचा अपघात होण्याची चिन्हे दिसत होती. पण तेवढ्यात हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं आहे. आणि संकट टळलं.
व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकतो
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विमानावर झालेला चक्रीवादळाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे, हवेच्या दाबामुळे हे विमान पूर्णपणे एका बाजूला झुकल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही धडकी भरली.
Challenging conditions at Chennai International airport as cyclone Fengal makes landfall near Puducherry and is likely to cross the Tamil Nadu coasts in the next three to four hours.
The cyclonic storm brought heavy rains in the coastal districts, inundating houses and… pic.twitter.com/1AUohfWfB9
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) November 30, 2024
दरम्यावन हा व्हिडिओ एक्सवर @aviationbrk या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, “बाप रे हे खूपच भितीदायक आहे.” तर दुसऱ्या एकाने म्हटलं आहे, ” बिचारे प्रवाशी, त्यांना मरण समोर आल्यासारखं वाटत असेल.” पण खरोखरच हा व्हिडीओ पाहून ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असंच या प्रवाशांसाठी म्हणावसं वाटतंय. कारण सुदैवाने ते सर्व सुखरूप आहेत.
भारतीय हवामान विभागच्या मते, फेंगल चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याचा वेग कमी झाला आहे. काल रात्रीपासून उत्तर तामिळनाडू – पुद्दुचेरी किनारपट्टीजवळ हे वादळ आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 7 किलोमीटर प्रति तास या वेगाने नेऋत्येकडे सरकलं आहे. पुढच्या तीन तासांमध्ये ते तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये ते हळुहळू पश्चिमेकडे सरकेल आणि कमकुवत होईल, असा अंदाज आहे.