VIDEO : हा व्यक्ती महाकाय मगरीला गोंजारायला गेला, मग काय झाले ते पहा
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.
मगर हा सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीच्या जवळ जाणे तर सोडाच, दूरवर पाहिले तरी सर्वांच्या पोटात गोळा येतो. मगर पाण्याखाली सिंहाशी स्पर्धा करू शकते आणि केवळ स्पर्धाच करू नाही त्याची शिकार पण करु शकते. अशा परिस्थितीत माणसांचे काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. भारतात सर्वसाधारणपणे मगर उघड्यावर फिरताना दिसत नाही आणि विशेषतः मानवी वस्तीत मात्र क्वचितच आढळतात. सध्या मगरीशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काय आहे व्हिडिओत?
या व्हिडीओमध्ये एक माणूस एका महाकाय मगरीला गोंजारताना दिसत आहे. मात्र यादरम्यान, मगरीने मागे वळून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच, त्या व्यक्तीची हालत खराब होते.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नदीच्या काठावर एक महाकाय मगर आरामात बसली आहे आणि एक व्यक्ती तिला प्रेमाने गोंजारत आहे. त्या व्यक्तीने मगरीच्या पाठीवरुन 3-4 वेळा हात फिरवला असेल की मगरी अचानक चिडली आणि त्याच्यावर हल्ला करते.
ही मगर एवढी महाकाय होती की, ती त्या व्यक्तीला क्षणार्धात गिळून झाली असती. मात्र या मगरीने त्या व्यक्तीला काही इजा केली की नाही. हे दृश्य पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर काटा येईल.
व्हिडिओला 28 हजाराहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे आणि विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
एका यूजरने लिहिले आहे की, ‘हा खूप धोकादायक स्पर्श होता’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ती व्यक्ती जवळजवळ मरणार होती’. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी त्या व्यक्तीला मूर्ख म्हणून संबोधले आहे, कारण त्याने काहीही विचार न करता भयानक प्राण्याजवळ जाण्याची चूक केली.