Viral: तू माझी पाठ खाजव, मी तुझी खाजवतो, आनंद महिंद्राकडून छोट्या लीमरचा व्हिडीओ पोस्ट, म्हणाले…

या व्हिडीओमध्ये लीमर नावाचा हा प्राणी झोपलेला दिसत असेल, ज्याला पाठीला खूप खाज येत आहे. मात्र, जसा आपलाही प्रॉब्लेम होतो, तसाच याचाही मोठा प्रॉब्लेम झाला आहे.

Viral: तू माझी पाठ खाजव, मी तुझी खाजवतो, आनंद महिंद्राकडून छोट्या लीमरचा व्हिडीओ पोस्ट, म्हणाले...
लीमर लहान मुलांकडून पाठ खाजवून घेताना
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 11:46 AM

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे प्रसिद्ध उद्योगपती सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असतात. त्यांनी पोस्ट केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये 2 लहान मुलं दिसत आहेत. जे एका वानराशी खेळताना दिसत आहेत. लीमर (Lemure) नावाचा हा प्राणी आहे, जो आफ्रिकेत (South Africa) आढळतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या प्राण्याचा प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.हा प्राणी ज्या प्रकारचं कृत्य त्या लहान मुलांना करायला लावतो आहे, हे हसवणारंच आहे

या व्हिडीओमध्ये लीमर नावाचा हा प्राणी झोपलेला दिसत असेल, ज्याला पाठीला खूप खाज येत आहे. मात्र, जसा आपलाही प्रॉब्लेम होतो, तसाच याचाही मोठा प्रॉब्लेम झाला आहे. या महाशयांचा हातच पाठीपर्यंत पोहचत नाही

हे सुद्धा वाचा

त्यामुळे हा लीमर खूप अस्वस्थ होताना दिसतोय.मात्र तेवढ्यात त्याला एक उपाय सापडतो, ही 2 लहान मुलं, जी त्याच्या बाजूला बसलेली आहे. त्यांना हा लीमर खूप क्यूट वाटतो, आणि ते त्याच्या पाठीवरुन हात फिरवायला लागतात.

पाहा व्हिडीओ:

मग काय, आयती सेवा मिळालेली कुणाला नको असते. आणि तीही अशा वेळी, जिथं तिची सर्वाधिक गरज आहे. मग काय लीमर राजा आपली सेवा करुन घ्यायला लागतात, पण जसा हा छोटा मुलगा पाठीवरुन हात काढतो, पुन्हा खाजेची उबाळी येते. मग हे लीमर राजेसाहेब परत त्या मुलाचा हात पकडतात, आणि पाठ खाजवायला सांगतात.

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करत एका इंग्रजी म्हणीचा दाखला दिला आहे. जिचा अर्थ होतो तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो, पण या लीमरच्या बाबतीत फक्त तूच माझी सेवा कर असा होताना दिसत असल्याचं ते म्हणतात. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. 19 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे तर जवळपास 2 हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.