आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे प्रसिद्ध उद्योगपती सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असतात. त्यांनी पोस्ट केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये 2 लहान मुलं दिसत आहेत. जे एका वानराशी खेळताना दिसत आहेत. लीमर (Lemure) नावाचा हा प्राणी आहे, जो आफ्रिकेत (South Africa) आढळतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या प्राण्याचा प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.हा प्राणी ज्या प्रकारचं कृत्य त्या लहान मुलांना करायला लावतो आहे, हे हसवणारंच आहे
या व्हिडीओमध्ये लीमर नावाचा हा प्राणी झोपलेला दिसत असेल, ज्याला पाठीला खूप खाज येत आहे. मात्र, जसा आपलाही प्रॉब्लेम होतो, तसाच याचाही मोठा प्रॉब्लेम झाला आहे. या महाशयांचा हातच पाठीपर्यंत पोहचत नाही
त्यामुळे हा लीमर खूप अस्वस्थ होताना दिसतोय.मात्र तेवढ्यात त्याला एक उपाय सापडतो, ही 2 लहान मुलं, जी त्याच्या बाजूला बसलेली आहे. त्यांना हा लीमर खूप क्यूट वाटतो, आणि ते त्याच्या पाठीवरुन हात फिरवायला लागतात.
Someone must have told this lemur about the old principle of ‘you scratch my back and I’ll scratch yours.’ The Lemur conveniently seems to have forgotten the second part… #friday pic.twitter.com/vGB5qZKxy2
— anand mahindra (@anandmahindra) September 15, 2022
मग काय, आयती सेवा मिळालेली कुणाला नको असते. आणि तीही अशा वेळी, जिथं तिची सर्वाधिक गरज आहे. मग काय लीमर राजा आपली सेवा करुन घ्यायला लागतात, पण जसा हा छोटा मुलगा पाठीवरुन हात काढतो, पुन्हा खाजेची उबाळी येते. मग हे लीमर राजेसाहेब परत त्या मुलाचा हात पकडतात, आणि पाठ खाजवायला सांगतात.
आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करत एका इंग्रजी म्हणीचा दाखला दिला आहे. जिचा अर्थ होतो तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो, पण या लीमरच्या बाबतीत फक्त तूच माझी सेवा कर असा होताना दिसत असल्याचं ते म्हणतात. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. 19 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे तर जवळपास 2 हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.