अबब! स्कूल बसमध्ये हा कोठून आला अजगर? व्हिडिओ पाहून कुणाचाही थरकाप उडेल
सोशल मीडिया प्राण्यांचे व्हिडिओ नेहमीच मोठ्या प्रमाणावर पसंत केले जातात. महाकाय अजगराचा व्हिडिओ देखील अनेकांना अचंबित करत आहे.
सोशल मीडियामध्ये रोज नवनवीन थरारक व्हिडिओ (Exciting Video) व्हायरल होतात. यात बहुतांश व्हिडिओ हे प्राण्यांसंदर्भात असतात. त्या व्हिडिओंमधून अनेकदा धक्कादायक गुपितांचा उलगडा होतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर वास्तवात असे काही घडले असेल यावर विश्वासही बसत नाही. असाच एक स्कूल बसमध्ये शिरलेल्या अजगराचा व्हिडिओ (Paython Video) सर्वांना थक्क करीत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे.
पालकांची धडधड वाढवली
उत्तर प्रदेश जिल्ह्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सापाचे नाव घेतले तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. व्हिडिओमध्ये तर महाकाय अजगर एका बसमध्ये शिरला आहे.
तो ज्या जागेवरून बसमध्ये घुसला, त्यावर कुणाचा विश्वास बसेनासा झाला आहे. रायबरेलीतील खाजगी शाळेच्या बसमध्ये अजगराने केलेली घुसखोरी लहान मुलांच्या पालकांची धडधड वाढवत आहे.
A python rescued from a school bus in Raibareli, UP pic.twitter.com/lN1LfIW4ic
— Sanat Singh (@sanat_design) October 16, 2022
बसच्या इंजिनमध्ये अडकला होता अजगर
मिळालेल्या माहितीनुसार, महाकाय अजगर स्कूलबसच्या इंजिनमध्ये अडकला होता. सुदैवाने त्यावेळी बसमध्ये लहान मुले नव्हती. स्थानिक लोकांना बसमधील अजगराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस, वनविभाग, अग्निशमन दल आदी यंत्रणा अलर्ट केले.
त्यानुसार बचाव यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेला अजगराची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल.
सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओ
सोशल मीडिया प्राण्यांचे व्हिडिओ नेहमीच मोठ्या प्रमाणावर पसंत केले जातात. महाकाय अजगराचा व्हिडिओ देखील अनेकांना अचंबित करत आहे. त्याचा थरारक अनुभव घेणारे लोक स्वतः व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करीत आहेत.