Video : साप आणि मुंगूसच्या लढाईत नेमकं कोण जिंकते? कथा नव्हे, व्हिडिओतून अनुभवायला मिळतोय थरार
अनेकदा दोन प्राण्यांमधील झुंजीचे व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये लोकप्रियता कमावत आहे. हा व्हिडिओ म्हणजे साप आणि मुंगूसमधील लढाईचा.
आपण साप आणि मुंगुसाच्या लढाईची गोष्ट ऐकली असेल. ती गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर तशी कल्पना उभी राहिली असेल. नेमकं त्या लढाईत कोण जिंकले असेल? सापाने मुंगूसला घायाळ केलं असेल की मुंगूसने सापावर जीवघेणा हल्ला (Attack) केला असेल? असे बरेच प्रश्न त्यावेळी आपल्यासमोर उभे राहिले असतील. ती गोष्ट कधी आपल्या डोळ्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून उभी राहील, अशी शंकाही त्यावेळी डोकावली नसेल. पण सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल (Viral on Social Media) झालेल्या व्हिडिओतून साप आणि मुंगूसमधील लढाईचा (Snake and mongoose fight) थरार अनुभवायला मिळत आहे. या आधी गोष्टीच्या रूपात लढाईचा मनोरंजक आनंद लुटणारे लोक व्हिडिओमधील साप आणि मुंगूसची झुंज पाहून तितकेच खुश होत आहेत.
तितकाच मनोरंजक, तितकाच थरारक
सोशल मीडियातील अनेक व्हिडिओमध्ये आपणाला प्राण्यांचे स्टंट्स पाहायला मिळतात. अनेकदा दोन प्राण्यांमधील झुंजीचे व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये लोकप्रियता कमावत आहे. हा व्हिडिओ म्हणजे साप आणि मुंगूसमधील लढाईचा.
दोघेही इतके इर्षेने पेटलेले दिसत आहेत, ते जणू एकमेकांच्या जीवावरच उठलेले आहेत. साप आणि मुंगूसचे वैर फार जुने मानले जाते. या दोघांच्या दुश्मनीच्या अनेक कथा यापूर्वी आपण ऐकलेल्या आहेत. त्यामुळे दोघांमधील झुंजीचा नवीन व्हिडिओ पाहताना वेगळाच थरारक आणि तितकाच मनोरंजक आनंद मिळत आहे.
सोशल मीडियामध्ये व्हिडिओ प्रचंड व्हायरल
साप आणि मुंगूसच्या दुश्मनीची गोष्ट सर्वांनीच ऐकलेली आहे. त्यामुळे साप आणि मुंगूसच्या झुंजीचा व्हिडिओ तितक्याच प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. अनेक जण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याखाली आवर्जून कमेंट्स टाकत आहेत.
इतक्यावरच न थांबता स्वतः अनुभवलेला थरार मित्रमंडळींनाही अनुभवण्यासाठी व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ट्विटरवर या व्हिडिओला अनेक उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बालपणी ऐकलेला गोष्टीतला आनंद सत्यात उतरल्याची प्रचिती घ्याल, एवढे नक्की.