Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : चक्रीवादळाचा कहर, हादरवून सोडणारी घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

तौक्ते चक्रीवादळाची भीषणता दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (gujarat tauktae cyclone video)

Viral : चक्रीवादळाचा कहर, हादरवून सोडणारी घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
TAUKTAE CYCLONE
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 10:29 PM

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे सगळ्यांची झोप उडाली आहे. महाराष्ट्रासह, गोवा, केरळ, कोकण किनारपट्टी या भागात वादळाने हाहा:कार माजवला आहे. या वादळामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो घरांचे नुकसान झाला आहे. याच पार्श्वभूमीवर तौक्ते चक्रीवादळाची भीषणता दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (video of Tauktae cyclone from Gujarat Una goes viral on social media)

घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे सगळे हैराण

व्हिडीओमध्ये वारे अतिशय जोरात वाहत असल्याचे दिसतेय. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे रस्त्यावरून चालणेसुद्धा मुश्कील झाले आहे. या वादळामध्ये कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर वादळ त्या व्यक्तीलासुद्धा आपल्यासोबत घेऊ जाऊ शकते. एवढ्या मोठ्या ताकदीने हे तौक्ते वादळ वाहत असल्याचे दिसतेय. अशाच प्रकारे वादळी वारे वाहत राहीले तर आगामी काळात येथे उभे असलेले ट्रॅक्टरसुद्धा हवेसोबत उडून जाते की काय ? अशी शंकासुद्धा या वादळाकडे पाहून उत्पन्न होतेय.

पाहा व्हिडीओ :

वादळाचे गुजरातकडे मार्गक्रमण

सध्याची स्थिती पाहून भारतीय हवामान खात्याने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. तौक्ते चक्रीवादळ हे आगामी काळात आणखी भीषण रुप धारण करणार असून ते गुजरातकडे मार्गक्रमण करत आहे. गुजरातकडे जाताना या वादळाची तीव्रता वाढणार आहे. आगामी 24 तासांमध्ये हे वादळ गंभीर स्वरुप धारण करु शकते, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. ज्या खात्यावर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे, त्यावर तो गुजरातमधील उना येथील असल्याचे सांगितले जातेय. ‘viralbhayani’ या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी घराच्या बाहेर पडू नका, काळजी घ्या. हे अतिशय भयानक आहे, अशा कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ  तौक्ते चक्रीवादळाचा असल्याचे सांगितले आहे. त्याची अजूनतरी पुष्टी झालेली नाही. तसा दावा केला जातोय.

इतर बातम्या :

Video | महिलेला ‘पोल डान्स’ची भारीच हौस, मध्येच ‘असं’ घडलं की व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

VIDEO: रस्त्यात मधोमध हत्तीला पाहून स्कूटीवरून पडला तरुण, नंतर जे काही झालं ते तुम्हीच पाहा

Video | इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाची हादरवून टाकणारी कथा, 10 वर्षीय मुलीचा व्हिडीओ पाहून काळीज पिळवटलं

(video of Tauktae cyclone from Gujarat Una goes viral on social media)

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.