Viral Video : जंगलात वाघाचं अख्खं कुटुंब मस्त दुपारची डुलकी काढतंय, IFS ने शेअर केला व्हिडीओ, युजर म्हणाले वाह !
वाघाच्या संपूर्ण कुटुंबाचा दुपारची मस्तपैकी डुलकी काढतानाचा एक सुंदर व्हिडीओ एका IFS अधिकाऱ्याने समाजमाध्यमावर व्हायरल गेला आहे. त्यावर युजरच्या प्रतिक्रिया येत आहेत.
नवी दिल्ली | 11 सप्टेंबर 2023 : वाघासारखा राजबिंडा प्राणी मानवाच्या हव्यासामुळे नष्ट होत चालला आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढविण्यासाठी व्याघ्र प्रकल्प राबविले जात आहेत. भारतात अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर वाघांची संख्या हळूहळू वाढत आहे. परंतू तरीही लपून छपूर वाघाच्या कातडी आणि नखांसाठी या राजबिंड्या प्राण्याची शिकार केली जात आहे. अशातच एक संपूर्ण वाघाची फॅमिलीच सावलीत मस्तपैकी आराम करीत पहुडल्याचा एक छान व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला इंटरनेट खूप पाहीले जात आहे.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्वीटर ) वर एका वाघांच्या कुटुंबाचा व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हाच व्हिडीओ आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी देखील शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करताना वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्याची कॅप्शन लिहीली आहे की ‘एक प्रेमळ कुटुंब आमच्या जगाच्या कॅनव्हासवर रंग जुळवताना.’ 9 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 45 हजार वेळा पाहीले गेले आहे.तर एक हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.
हाच तो वाघाचा व्हिडीओ –
A loving family adds color to the canvas of our world 💕💕 (Keep the sound on to have the real feel of our forest) As received in WA pic.twitter.com/D26UzToizl
— Susanta Nanda (@susantananda3) September 9, 2023
भारतीय वन सेवा अधिकारी रमेश पांडे यांनी देखील हाच व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी त्यास कॅप्शन दिली आहे. त्यात लिहीलंय की, ही झोपेची वेळ आहे. एका मादी वाघांना तिच्या बछड्यांचे पालन करणे अवघड जबाबदारी आहे. ती संपूर्ण काळजीपूर्वक ही जबाबदारी पार पाडते. त्यांना जगायला आणि शिकार करायला शिकविते. या व्हिडीओत वाघाचे बछडे आपल्या पालकांच्या सुरक्षेत बिनधास्त झोपलेले आहेत. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ एप्रिल 2020 मध्ये व्हायरल झाला होता. वन अधिकारी रवींद्र मणि त्रिपाठी यांनी शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले होते की कौटुंबिक प्रकरण, एमपीच्या सातपुडा जंगलातील रस्त्याच्याकडेला वाघ दिसला. व्हिडीओत दोन वाघ रस्त्याच्या मधोमध बसले होते. तर साथीदार दोन वाघ आरामात फिरत होते.