VIDEO | मेट्रोमध्ये स्वागत… दरवाजा बंद झाल्यानंतर काकांनी तोंडातून काढला धूर, पाहा व्हिडीओ
VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती बिडी ओढताना दिसत आहे. शेजारी असणाऱ्या लोकांना त्या वयोवृ्ध्द काकांची स्टाईल अधिक आवडली आहे. त्याचा एकाने व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.
![VIDEO | मेट्रोमध्ये स्वागत… दरवाजा बंद झाल्यानंतर काकांनी तोंडातून काढला धूर, पाहा व्हिडीओ VIDEO | मेट्रोमध्ये स्वागत… दरवाजा बंद झाल्यानंतर काकांनी तोंडातून काढला धूर, पाहा व्हिडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/09/New-Project-12.jpg?w=1280)
दिल्ली : दिल्ली मेट्रोतील (delhi metro) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) झाले आहेत. त्यापैकी काही व्हिडीओ असे होते की, त्या लोकांवर मेट्रोने कारवाई केली आहे. त्याचबरोबर काही व्हिडीओ असे आहेत की, त्यावर लोकांनी विचार सुध्दा केला आहे. दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ नेहमी व्हायरल (trending video) होतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एक वयोवृध्द व्यक्ती बिडी मेट्रोमध्ये ओढत आहे. काही लोकांना तो व्हिडीओ पाहून देवानंदची आठवण नक्की झाली असणार, त्या गाण्याचे शब्द होते, ‘हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया.’
त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती मेट्रोमध्ये बसली. मेट्रोचा दरवाजा बंद झाल्यानंतर त्या व्यक्तीने बिडी पेटवली. ती ओढत असताना सगळीकडे धूर झाला आहे. हा प्रकार पाहून शेजारी असलेले प्रवासी हैराण झाले आहेत. काही प्रवाशांनी त्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ते काका ऐकण्याच्या पलिकडचे असल्यामुळे त्यांनी संपूर्ण बिडी मेट्रोमध्ये ओढली आहे.
काकाचा हा अंदाज नेटकऱ्यांना सुध्दा अजिबात आवडलेला नाही. काही लोकांनी त्या काकाचा व्हिडीओ शेअर करीत असताना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना टॅग केला आहे. लोकांचं असं म्हणणं आहे, यापेक्षा नाचणारे परवडले. परंतु लोकांच्या आरोग्या खेळण योग्य नाही.
इंन्स्टाग्रामवरती हा व्हिडीओ akash_kumar_iron_wox_gym या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ८३ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, दिल्ली मेट्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. बिडी ओढणारे काका, दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, काकाला वाटलं की, ही लोकलं ट्रेन आहे.