Viral Video | व्हेल माशाची बोटीला टक्कर; माणूस थेट समुद्रात, पाहा थरारक व्हिडीओ

व्हेल माशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून लोक चकित झाले आहेत. (whale fish viral video)

Viral Video | व्हेल माशाची बोटीला टक्कर; माणूस थेट समुद्रात, पाहा थरारक व्हिडीओ
whale fish video
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 7:07 PM

मुंबई : समुद्रातील जैवविविता अनेकांना थक्क करणारी आहे. समुद्रात मुंगीच्या आकाराएवढे जीव तसेच थेट 50 टनापर्यंतचे व्हेल मासेसुद्धा सापडतात. व्हेल मासा हा समुद्रातील सर्वात मोठा मासा असल्याचे सांगितले जाते. सर्वात मोठा असल्यामुळे त्याला पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. मात्र, वाढते जलप्रदूषण पाहता त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. याच व्हेल माशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून लोक चकित झाले आहेत. (video of Whale fish goes viral who pushes man and boat into sea)

…आणि व्हेल माशाने बोटीला टक्कर दिली

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आफ्रकेच्या Algoa Bay येथील आहे. 3 एप्रिल रोजी Marino Gherbavaz आणि त्यांची मुलगी व्हेल माशाला पाहण्यासाठी एका क्रुझ बोटीमध्ये बसले होते. यादरम्यान एक तब्बल 40 टन वजनाचा व्हेल मासा जेवणासाठी वर आला. याच दरम्यान व्हेल माशाने Marino Gherbavaz आणि त्यांच्या मुलीच्या क्रुझ जहाजाला टक्कर दिली.

टक्कर दिल्यामुळे Marino समुद्रात पडले

ही टक्कर दिल्यानंतर Marino विशाल सागरात पडल्याचे दिसत आहे. Marino जेव्हा पाण्यात पडले तेव्हा त्यांच्या आसपास 40 टनांचा व्हेल मासासुद्धा दिसतोय. हा सगळा प्रकार अचानक झाल्यामुळे Marino आणि त्यांची मुलगी चांगलीच घाबरली होती. व्हेल मासा Marino यांच्यावर हल्ला करतो की काय, याचीच चिंता सर्वांना लागली होती. मात्र योगायोगाने समुद्रात पडल्यानंतर Marino कसेबसे पुन्हा बोटीत चढू शकले. एवढा सारा हेलावून टाकणारा प्रकार घडूनही Marino सुखरुप वाचले.

पाहा व्हिडीओ :

प्रकार पाहून मुलगी चांगलीच घाबरली

या घटनेबद्दल इंग्रजी वृत्त संकेतस्थळ Mirror ने सविस्तर वृत्त दिलं आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर Marino यांची मुलगी चांगलीच घाबरली होती असं या वृत्तपत्राने म्हटलं आहे. नंतर Marino सुखरुप बोटीत चढल्यानंतर त्यांच्या मुलीच्या जीवात जीव आला असं Mirror ने म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 40 टन वजन असलेल्या व्हेल माशाने थेट बोटीला टक्कर दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या :

“सरकारने सर्वात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा”

VIDEO | ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना घाणेरडे मेसेज, महिलेकडून बॉसची चांगलीच धुलाई, व्हिडीओ व्हायरल

Video | रांगड्या कवीचा ‘गावरान जांगडगुत्ता’, प्रेम आणि प्रेयसीची धम्माल कविता; एकदा पाहाच

(video of Whale fish goes viral who pushes man and boat into sea)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.