VIDEO | भटक्या कुत्र्यांना घाबरलेल्या महिलेच्या स्कुटीची कारला जोराची धडक, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेला व्हिडीओ २५ सेंकदाचा आहे. भटकी कुत्री स्कुटीचा पाठलाग करीत आहेत. कुत्र्याच्या भुंकण्यामुळं महिलांचं लक्ष पुढे अजिबात नाही. त्यामुळं हा अपघात झाला आहे.
ओडिशा : ओडिशा (Odisha) राज्यात भटक्या कुत्र्यांपासून (Stray dog) महिला वाचली, पण थेट कारला (BIKE CAR ACCIDENT) जावून धडकली. त्यावेळी स्कुटीवरती दोन महिला आणि एक चिमुकला असल्याचं दिसतं आहे. झालेल्या अपघातामध्ये तिघांना सुध्दा जखमी झाली असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्यावेळी पाच भटकी कुत्री त्या महिलेच्या स्कुटीचा पाठलाग करीत होती. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे महिलेचं लक्ष समोर नव्हतं, तर सगळं लक्ष कुत्र्यांवरती होतं. त्यामुळे महिला कारला धडकली असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतं आहे.
तिथं भटकी कुत्री अधिक असल्यामुळं…
समाचार एजन्सीने दिलेल्या बातमीनुसार, ही घटना ओडीसा राज्यातील बेरहामपूर शहरातील असल्याचं सांगितलं जात आहे. तिथं भटकी कुत्री अधिक असल्यामुळं महिला घाबरुन एका बाजूने गाडी चालवत होती. त्यावेळी स्कुटी कारला धडकली, त्याचबरोबर लहान मुलाला आणि दोन महिलांना दुखापत झाल्याची माहिती दिली आहे.
व्हिडीओ २५ सेंकदाचा…
व्हायरल झालेला व्हिडीओ २५ सेंकदाचा आहे. भटकी कुत्री स्कुटीचा पाठलाग करीत आहेत. कुत्र्याच्या भुंकण्यामुळं महिलांचं लक्ष पुढे अजिबात नाही. त्यामुळं हा अपघात झाला आहे. स्कुटी इतक्या जोरात कारला धडक मारली की, दोन महिला आणि एक मुलगा हवेत उडून खाली पडले.़
#WATCH | Odisha: A woman who was scared of being bitten by stray dogs, rammed her scooty into a car parked on the side of the road in Berhampur city. There were three people on the scooty; all have sustained injuries in the incident. (03.04)
(Viral CCTV visuals) pic.twitter.com/o3MeeBYYPm
— ANI (@ANI) April 3, 2023
भूंकत असणारी कुत्री तिथून पळून
व्हिडीओत दिसत असलेल्या स्कुटीवर तीन जण होती. तिघांना सुध्दा जखम झाली आहे. ज्यावेळी स्कुटी जोराची धडकते त्यावेळी पाठीमागे लागून भूंकत असणारी कुत्री तिथून पळून जातात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.