video : या नवरदेवाचा डान्स पाहून पब्लिक झालं हैराण, नवरीची एण्ट्रीही ठरली फिकी

| Updated on: May 24, 2023 | 6:09 PM

लग्नाच्या वरातीत वधू आणि वरांकडून डान्स करून सर्वांचे लक्ष वेधण्याचे आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. असाच एक वराच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

video : या नवरदेवाचा डान्स पाहून पब्लिक झालं हैराण, नवरीची एण्ट्रीही ठरली फिकी
groom dance
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : इंटरनेटवर लग्नाच्या वरातीचे तसेच वधू आणि वराच्या गंमती जमतीचे इतके व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत की त्याला पाहून चांगलेच मनोरंजन होत असते. अनेक व्हिडीओमध्ये नवरदेव किंवा नवरी मुलगी हल्ली डान्स करताना दिसत आहेत. स्वत:च्या लग्नात अशा प्रकारे डान्स करणाऱ्यांना पाहून अनेक जण विविध मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. अशाच एका नवरदेवाच्या डान्स व्हिडीओने सोशल मिडीयावर खळबळ उडाली आहे. या नवरदेवाचा व्हिडीओ पाहून आपलीही पावले थिरकतील असा त्याचा डान्स आहे.

व्हायरल झाला वराचा अनोखा डान्स

सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वराचे मित्रही त्याच्या डान्सला स्टेप बाय स्टेप पाठींबा देत उत्कृष्ट कोरीओग्राफीचा नमूनाच त्यांनी सादर केला आहे. नवदेवाचा उत्साह पाहून तुम्हालाही त्याच्या ऊर्जापाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

येथे पाहा व्हिडीओ…

नवऱ्याच्या डान्स व्हिडीओने उडाला धुरळा

सोशल मिडीयावर हा डान्स व्हिडीओ 21 मे रोजी शेअर करण्यात आला आहे. केवळ 26 सेंकदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 59 हजार लोकांनी पाहीले आहे. तर एक हजाराहून अधिक लोकांना लाईक्स केले आहे. नवऱ्याने इतर सर्वांना डान्स मध्ये अक्षरश: फेल केले आहे. या व्हिडीओला खूपच पाहिले जात असून पसंद केले जास्त आहे.