Girls offering Namaz in govt school : हिजाबप्रकरण (Hijab) सध्या देशभर गाजत आहे. शाळा-कॉलेजमध्ये कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) हिजाबवर बंदी (Ban) घातली. त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. यावरचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यात भगवे शेले घातलेल्या तरुणांचा एका तरुणीसमोरचा धुडगूस दिसून आला होता. कर्नाटकातला तो व्हिडिओ होता. धक्कादायक अशा व्हिडिओनंतर संबंधित तरुणीचं कौतुकही करण्यात आलं. मात्र देशाच्या एकतेसाठी हे सर्व घातक आहे. आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, तोही कर्नाटकातलाच आहे. शाळकरी मुलींचा हा व्हिडिओ असून आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अशा घटना टाळणं गरजेचं असल्याची गरज नेटिझन्स व्यक्त करत आहेत.
बागलकोटमधली घटना
व्हायरल झालेला हा व्हिडिओ कर्नाटकातल्या बागलकोट इथला आहे. सरकारी शाळेतला हा व्हिडिओ असून लहान मुली नमाज अदा करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. सरकारी शाळेची इमारत दिसतेय. समोर मैदान आहे. वर्गखोल्यांच्या समोरच्या भागात काही मुली नमाज अदा करताना दिसत आहेत. मैदानात काही मुलं खेळत असल्याचं दिसतंय. मात्र ही घटना चिंता वाढवणारी असून अशा गोष्टी देशाच्या एकतेसाठी घातक असल्याचा सूर उमटत आहे.
ट्विटरवर शेअर
मेघ अपडेट्स (MeghUpdates) या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. घटनेसंबंधीची कॅप्शन देण्यात आलीय. 65 हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिलाय. तर मनिष मुंद्रा यांनी तो रिट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. यूझर्सनीही यावर कमेंट्स करत जग पुढे चाललंय पण भारत आणखी मागे चालल्याचं म्हटलंय.
If such acts in schools are not stopped immediately. We as a country are gonna go down. Tomorrow other kids will do aarti and hawan. Instead of focusing on studies they are being turned into religious fanatics. https://t.co/Ku0nN3HPyR
— Manish Mundra (@ManMundra) February 13, 2022
आणखी वाचा :