सहारनपूरमधून खुणावतोय हिमालयाच्या पर्वतरांगांचा नजारा; मनमोहक फोटो सोशल मीडियात व्हायरल
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून हिमालयाच्या उंच पर्वतरांगा पाहायला मिळत आहे. या पर्वतरांगांची विलोभनीय छायाचित्रे सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. ही सगळी छायाचित्रेच आपला जीव गुंतवणारी, वेड लावणारी आणि प्रेमात पाडणारी आहेत. (View of the Himalayan mountain range from Saharanpur; Adorable photos go viral on social media)
उत्तर प्रदेश : कोरोना महामारीचे जीवघेणे संकट संपूर्ण जगावर ओढवले. या महाभयंकर विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांना लॉकडाऊन लागू करावा लागला. काही देशांना या माध्यमातून वेळीच संसर्गावर नियंत्रण मिळवता आले तर काही देश हळूहळू कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत आहेत. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम मात्र दिसला आहे. लोक घरीच राहिल्यामुळे संसर्गाचा विस्फोट रोखला गेला. तसेच मोठ्या प्रमाणावर गाड्यांची वर्दळ थांबल्यामुळे त्याचा पर्यावरणावर, निसर्गावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. याच लॉकडाऊनमुळे उत्तर भारतातील निसर्गाचा अद्भूत, विलोभनीय नजारा दूरवरूनही पाहायला मिळत आहे. अगदी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून हिमालयाच्या उंच पर्वतरांगा पाहायला मिळत आहे. या पर्वतरांगांची विलोभनीय छायाचित्रे सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. ही सगळी छायाचित्रेच आपला जीव गुंतवणारी, वेड लावणारी आणि प्रेमात पाडणारी आहेत. त्यामुळे सोशल मीडियातील कुठल्याही साईट्सवर ही चित्रे नजरेस पडताच ती पुढे शेअर करण्यावाचून कुणी थांबत नाही. (View of the Himalayan mountain range from Saharanpur; Adorable photos go viral on social media)
विलोभनीय छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल
देशात गेल्या वर्षी कोरोना विषाणूने शिरकाव केला होता. त्यावेळी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्येही उत्तर भारतातील निसर्गाची अद्भूत छायाचित्रे व्हायरल होत होती. त्या छायाचित्रांमध्ये निसर्ग वर्षानुवर्षे आपल्या जुन्या रंगामध्ये, जुन्या रूपात दिसला. यावर्षीही पुन्हा उत्तर भारतातील त्याच काही ठिकाणची विलोभनीय छायाचित्रे सोशल मीडियातील युजर्सच्या मनावर अधिराज्य करताहेत. यंदा व्हायरल झालेल्या छायाचित्रांमधून हिमालयातील हिमाच्छादित डोंगर आपल्याला जणू साद घालताहेत.
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी केले फोटो शेअर
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही छायाचित्रे शेअर केली आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ही छायाचित्रे दुष्यंत कुमार यांनी टिपली आहेत. दुष्यंत हे आयकर निरीक्षक असून सहारनपुरात त्यांची पोस्टिंग आहे. छायाचित्रांमध्ये हिमालयातील हिमाच्छादित पर्वतरांगांचा नजारा पाहायला मिळत आहे. कुमार यांच्याव्यतिरिक्त इतर लोकांनीही हिमाच्छादित पर्वतरांगांची दृश्ये आपल्या कॅमेर्यात कैद केली आहेत. त्यांची छायाचित्रे सोशल मीडिया अकाउंटवर अधिकाधिक शेअर केली जात आहेत.
डॉ. विवेक बॅनर्जींनीही टिपले छायाचित्र
असेच एक छायाचित्र डॉ. विवेक बॅनर्जी यांनी टिपले आहे. पाऊस पडल्यानंतर आकाश खूप स्पष्ट अर्थात निरभ्र झाले आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 85 पर्यंत वाढला आहे. त्यामुळे हिमाच्छादित हिमालय पर्वतरांगा समोर दिसू लागल्या आहेत. गेल्या वषीर्ही रमेश पांडे यांनी ही छायाचित्रे शेअर केली होती. ‘हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे आता सहारनपुरातून दिसत आहेत. लॉकडाऊन आणि पावसाने हवेची गुणवत्ता सुधारली आहे’ असे पांडे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एकूणच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे विषाणूचा संसर्ग थोपवण्याबरोबरच निसर्गावरही बराच मोठा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गाड्यांची कमी झालेली वर्दळ तसेच प्रदूषणकारी कारखाने बंद राहिल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकार सांगतात. (View of the Himalayan mountain range from Saharanpur; Adorable photos go viral on social media)
This is another view captured by Dushyant Kumar IT Inspector posted in Saharanpur. https://t.co/5u1S6fn55i pic.twitter.com/CBDYt5o0tV
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) May 20, 2021
इतर बातम्या
केंद्राने अंदाजपत्रकात लसीकरणासाठी 35 हजार कोटी राखून ठेवले होते, ते गेले कुठे? – पृथ्वीराज चव्हाण