VIDEO : लग्नात प्रेमाचा घास भरवायला गेला आणि थोबाडीत खाल्ली, नवरा-नवरीचा तुफान राडा
सध्या एक लग्नातील नवरदेव आणि नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी जबरदस्ती नवरदेवाला मिठाई भरवत असल्याच आपल्याला दिसत आहे
नवी दिल्ली : सध्या लग्नातील विधी आणि परंपरांमध्ये खूप बदल होत आहेत. सुरुवातीच्या काही दिवस आधी वरमाला ही साध्या पद्धतीने एकमेकांना घातली जात होती. पण आता वरमालेचा कार्यक्रमात बदल होताना दिसत आहे. यात नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात फुलांचा हार म्हणजेच वरमाला घालतात आणि आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
लग्नातील वरमाळेच्या कार्यक्रमात नवरदेव आणि नवरी हे एकमेकांना फुलांचे हार घालत असतात. त्यानंतर एकमेकांना मिठाई भरवत असतात. मात्र सध्या एक लग्नातील नवरदेव आणि नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी जबरदस्ती नवरदेवाला मिठाई भरवत असल्याच आपल्याला दिसत आहे. त्यानंतर नवरदेवही नवरीला जबरदस्ती मिठाई भरवतो. त्यावेळी नवरीला त्या गोष्टीचा खूप राग येतो. कसलाही विचार न करता नवरी सगळ्यांसमोर नवरदेवाला चापट मारते. नवरीचं हे रुप पाहून पाहुणे मंडळीही थक्क झाले आहेत.