Viral Video : विमानात खिडकी उघडण्यासाठी त्या व्यक्तीने एअर होस्टेस बोलावलं, म्हणाला “मला गुटखा थुंकायचा आहे…” पाहा व्हिडीओ
Viral Video : प्रवासी म्हणाला 'विमानाचा दरवाजा उघडा मला गुटखा खाऊन थुंकायचं आहे, व्हिडीओत पाहा एअर होस्टेसने काय उत्तर दिले
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ (Viral video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका तरुणाची मागणी पाहूण तुम्ही नक्की हसाल अशी मागणी आहे. विमानातील (plane) आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मागच्या आठवड्यात एका पुरुषाने महिलेच्या अंगावर लंघुशंका केली होती. त्यानंतर एका प्रवाशाने विमानतळाच्या गेटवर लघुशंका केल्याचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला होता. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुणाला विमानात बसून गुटखा खायचा आहे, त्यासाठी तो एअर होस्टेसला विनंती करीत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत विमान उड्डान घेण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी एका व्यक्तीच्या हातात गुटखा आहे, त्यावेळी तो एअर होस्टेसला आवाज देतो. त्यावेळी एअर होस्टेसला सांगतो की, विमानाचा दरवाजा उघडा मला थुंकायचं आहे. त्यानंतर ती एअर होस्टेस प्रचंड हसली, तिचा हसू आवरेना असं व्हिडीओत दिसतंय. त्यानंतर शेजारची लोकं सुध्दा जोरजोरात हसली.
View this post on Instagram
हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केली आहे. काही लोकांनी मजेशीर कमेंट केली आहे. तर काही लोकांनी त्या व्यक्तीला सल्ला दिला आहे.