प्रेमाच्या चिठ्ठ्या पोहोचल्या पण लग्नाला उरले केवळ काही तास, विशाल कुसुमला पळवून नेण्यात यशस्वी होणार?, नेटकऱ्यांची धाकधुक वाढली…

कुसुम आणि विशालच्या प्रेमाच्या चिठ्ठ्या एकमेकांपर्यंत पोहोचल्या आहेत. पण आता लग्नाला उरलेत केवळ काही तास. त्यामुळे विशाल कुसुमला पळवून नेण्यात यशस्वी होणार का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांची धाकधुक मात्र वाढली आहे.

प्रेमाच्या चिठ्ठ्या पोहोचल्या पण लग्नाला उरले केवळ काही तास, विशाल कुसुमला पळवून नेण्यात यशस्वी होणार?, नेटकऱ्यांची धाकधुक वाढली...
लगीनघटिका समीप आली...
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:53 AM

मुंबई : आज तारीख आहे 26 एप्रिल. म्हणजेच कुसुमच्या लग्नाचा दिवस… आज कुसुमसह देशाच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. त्याचं कारणंही तसंच आहे. कुसुमचं विशालवर प्रेम आहे. पण तिच्या घरचे तिच्या प्रेमातले व्हिलन झालेत. तिच्या लाडक्या विशालला सोडून तिचं भलत्याच मुलाशी लग्न जमवलंय. पण कुसुमचा जीव मात्र तिच्या विशालमध्येच अडकून आहे. त्यामुळे तिने तिच्या प्रिय विशालला प्रेमपत्र (Viral Love Letter) लिहिलं. आपल्याला हे लग्न मान्य नसल्याचं सांगत मला इथून पळवून घेऊन जा, अशी गळ घातली. तिचं हे दहा रूपयांच्या नोटेवरचं पत्र व्हायरल झालं अखेर तिच्या विशालने तिला उत्तर दिलं. मी तुला घेऊन जाईलं असं आश्वासन दिलं. पण आज खरा कसोटीचा दिवस आहे. आज वेळेत विशाल पोहोचला तरच काहीतरी घडू शकतं. अन्यथा कुसुमचं त्या भलत्याच मुलाशी लग्न होईल. या सगळ्याची इंटरनेटवर चर्चा (Viral News) आहे. नेटकऱ्यांची धाकदुक चांगलीच वाढली आहे.

लगीनघटिका समीप आली…

कुसुमचं आज लग्न होणार आहे. हे लग्न किती वाजता आहे, कुठे आहे, कुणासोबत आहे, याची ठोस माहिती कुणाकडेही नाही. पण या लग्नाची चर्चा मात्र फार होतेय. तिचं लग्न होणार की ती विशालसोबत पळून जाणार यावर सध्या अनेकजण बोलत आहेत.

लग्न कुसुमचं नेटकरी टेन्शनमध्ये

आज कुसुमचं लग्न आहे. पण तिचं लग्न तिच्या मनाविरूद्ध लावलं जातंय. त्यामुळे नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. कुसुमच्या लग्नाबाबात काय होणार यावर अनेकजण बोलताहेत.

कुसुमचं पत्र

एक पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे पत्र एका प्रेयसीने तिच्या प्रियकराला पाठवलं आहे. त्याचं कारणही तितकंच रंजक आहे. हे पत्र कुसुम नावाच्या मुलीने तिचा प्रियकर विशालला हे पत्र पाठवलंय. माझं 26 एप्रिलला लग्न आहे. त्याआधी तू मला पळवून घेऊन जा, असं या पत्रास म्हटलंय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशालचं उत्तर

कुसुमचं हे पत्र लग्नाच्या एक दिवस आधी विशालकडे पोहोचलं आहे. त्याला त्यानेही दहा रूपयांच्या नोटेवर पत्र लिहित उत्तर दिलंय. कुसुम तुझं पत्र मिळालं. मी तुला न्यायला येतोय. आय लव्ह यू! तुझाच प्रिय विशाल, असं या पत्रात लिहिलं आहे.

एक काळ होता जेव्हा कागदावर पत्र लिहिलं जायचं… ते पाठवलं जायचं मग त्याचं उत्तर यायचं… पण सध्या इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे दोन ओळींचा मेसेज टाईप केला समोरच्याला पाठवला विषय संपला… असंच काही घडत असतं. तरीही काही प्रेमी मात्र आजही पत्राचाचा आधार घेतात. काहीजण तर चक्क आपल्या भावना पोहोचवण्यासाठी नोटेचा आधार घेतात. अश्या नोटेवरच्या पत्राची ही गोष्ट… आता खरंच विशाल कुसुमला लग्नाच्या दिवशी आधी पळवून घेऊन जाणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

दरम्यान, या आधी काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारची दहा रुपयांची नोट व्हायरल झाली होती. त्यावर ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असं लिहिलं होतं. त्यावरुन अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

संबंधित बातम्या

Video : जिराफ आणि चिमुरड्याची दोस्ती, नेटकरी म्हणतात, “जगातील सर्वात गोड व्हीडिओ”

Video : लोकांचा डान्स सोडा, छोट्या कॅमेरामनची स्टाईल बघा, फॅन होऊन जाल…

वडिलांच्या मारेकऱ्याच्या मुलासोबत तरूणीने बांधली लग्नगाठ, आईनंही रोखलं नाही, कारण तर वाचा…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.